कॉर्न सिख कबाब
इथे खूप सारे कणीस मिळतात. नेहमी आम्ही त्याला भाजुल लिंबू आणि तिखट मीठ लावून खातो पण ह्यावेळी मी जरा वेगळे काहीतरी करण्याचे ठरवले.
साहित्य
४ कणीस
२ बटाटे
४ चमचे कॉर्न फ्लौर
६ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
१ कांदा
१/४ वाटी कोथिंबीर
मीठ
लोणी/तूप
कृती
- कणीस आणि पाणी एकत्र करून साधारण २५ मिनिट उकळवणे. कणीस थंड करणे.
- बटाटे उकडून थंड करणे.
- मिक्सर मध्ये लसूण, मिरची आणि कांदा वाटून घेणे.
- कणीस आणि बटाटे किसून एकत्र करणे.
- त्यात वाटण, कोथिंबीर, कॉर्न फ्लौर आणि मीठ घालुन मळणे.
- लांबट आकाराचे कबाब बनवणे.
- ओव्हन ४००F/२००C वर गरम करणे.
- बेकिंग ट्रेला लोणी किंवा तुपाचा हात लावून त्यावर कबाब ठेवणे.
- ओव्हनमध्ये ४००F/२००C वर १५ मिनिट भाजणे.
- सगळे कबाब परतवून अजून १५ मिनिट भाजणे
टीप
मी मिश्रण बनवताना कमीत कमी मसाले वापरून कणीसाची चव शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला.
कबाब तव्यावर मध्यम आचेवर भाजत येतील पण मी ओव्हन वापरल्यानी त्या वेळात मी दुसरी कामे करू शकले.
0 comments:
Post a Comment