May 2009
04
कुरकुरीत इंडिअन हॅश ब्राऊन
मी २-३ आठवड्यांपूर्वी हे बनवलेले पण आज पोस्ट करत आहे. एकदम कुरकुरीत आणि चाविस्था पदार्थ
साहित्य
२ बटाटे
१ हिरवी मिरची
१/४ वाटी पिकल्ड काकडी
चिमुटभर मिरे पूड
मीठ
तूप
कृती
- बटाटे किसून पाण्यात चांगले धुवून घेणे.
- पाणी निथळवून पेपर वर सुकण्यासाठी पसरवणे.
- सुकवलेला बटाटा कीस, हिरव्या मिरच्या, पिकल्ड काकडी, मिरे पूड आणि मीठ सगळे एकत्र करणे.
- तवा गरम करून त्यावर तूप सोडणे.
- बटाटा तव्यावर पातळ पसरवणे.
- मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत भाजणे.
टीप
मी मध्यम किसणीवर बटाटे किसले आणि त्यामुळे एकदम छान कुरकुरीत हॅश ब्राऊन झाले. जर जाड किसले तर कुरकुरीत होणे मुश्कील आहे.
हिरव्या मिरचीमुळे एकदम छान तिखट चव येते.
0 comments:
Post a Comment