अननसाचा मुरंबा
मागच्या महिन्यात आम्ही एक मोठा अननस आणलेला. मला आईचा मुरंबा आठवला. लगेच आईला फोन केला आणि तेंव्हा कळले की बनवायला किती सोप्पा आहे ते. मी त्याच रात्री बनवून टाकला.
साहित्य
५ वाटी अननस
३ वाटी पाणी
१.५ वाटी साखर
कृती
- अननस पाण्यात बुडेल इतके पाणी घालुन मध्यम आचेवर झाकण लावून शिजवावा.
- अननस गाळून पाणी वेगळे करणे.
- त्याच पाण्यात साखर घालुन उकळी आणणे. मध्यम आचेवर सारखे ढवळत एक तारी पाक बनवणे.
- त्यात शिजवलेला अननस घालुन अजून एकदा उकळी आणणे.
- थंड करून फ्रीजमध्ये ठेवणे.
टीप
मुरंबा फ्रीजमध्ये ठेवावा म्हणजे थोडे महिने चांगला राहतो.
चपाती किंवा पराठ्याबरोबर एकदम छान लागतो
मला फार जास्त पाक आवडत नाही त्यामुळे वरच्या प्रमाणात कमी गोड व कमी पाक होतो. त्यात अजून १ वाटी पाणी आणि अर्धा वाटी साखर घालुन जास्त पाक बनवता येईल.
0 comments:
Post a Comment