भेळ
भेळ हा माझा आवडीचा चटपट पदार्थ. खासकरून पिकनिकसाठी. लवकर बनणारा सोपा आणि चविष्ठ पदार्थ.
साहित्य
६ वाटी चुरमुरे
२ वाटी फरसाण
१ वाटी शेव
१ वाटी बुंदी
१ वाटी नवरत्न मिश्रण
१.५ वाटी चिंच
२ वाटी गुळ
२ हिरवी मिरची
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
४-५ खजूर
२ कांदे
२ टोमाटो
१/२ वाटी कोथिंबीर
मीठ
कृती
- चिंच आणि खजूर पाण्यात एक तास भिजवणे.
- भिजलेले चिंच खजूर, गुळ, तिखट, हिरवी मिरची, जिरे पूड आणि मीठ घालुन मिक्सरमध्ये वाटणे.
- मिश्रण गाळून घेणे.
- एका भांड्यात चुरमुर, फरसाण, शेव, नवरत्न मिश्रण, चिरलेला कांदा, टोमाटो आणि कोथिंबीर एकत्र करणे.
- त्यात चिंचेचे मिश्रण घालुन चांगले ढवळणे.
- वरून बुंदी आणि शेव घालुन खायला देणे.
टीप
कैरीच्या दिवसात बारीक चिरून कैरीपण घालता येईल
मी नेहमी चिंचेचे थोडे पाणी वेगळे ठेवते त्यामुळे प्रत्येकाच्या चवीनुसार ते वरून थोडे घेऊ शकतात
सगळे चिरून ठेवल्यास फक्त एकत्र करण्याचे काम राहते, पार्टी आणि पिकनिकसाठी एकदम उत्तम
0 comments:
Post a Comment