गाजराचा पराठा
आज काहीतरी सोप्पे पण नवीन रात्रीच्या जेवणात बनवायचे होते. पराठा बनवण्याचे ठरवले पण नेहमीचा न करता काहीतरी वेगळा बनवण्याच्या विचारांनी मी हा पराठा बनवला.
साहित्य
१.५ बटाटा
२ वाटी किसलेले गाजर
२.५ वाटी गव्हाचे पीठ
१ चमचा तिखट
३/४ चमचा धने पूड
१/४ चमचा ओवा
१/२ लिंबू
मीठ
तेल
तूप
कृती
- गव्हाचे पीठ, मीठ आणि २ चमचे तेल घालुन एकत्र करणे.
- पाणी घालुन पीठ भिजवणे आणि तेलाचा हात लावून अर्धा ते एक तास भिजायला ठेवून देणे.
- बटाटे उकडून थंड करणे.
- कुस्करलेले बटाटे आणि किसलेले गाजर एकत्र करणे.
- त्यात तिखट, मीठ, धने पूड, ओवा आणि लिंबाचा रस घालुन एकत्र करणे.
- पीठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करणे. गजराच्या मिश्रणाचे सुद्धा त्याच आकाराचे गोळे करणे.
- पिठाच्या गोळ्याची वाटी करून त्यात गाजराचा गोळा घालुन बंद करणे.
- भरलेला पराठा अलगद पणे लाटून, मध्यम आचेवर तव्यावर दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत तेल सोडून भाजणे.
- तूप लावून दही आणि लोणच्याबरोबर वाढणे.
टीप
पूर्णपणे तुपावर भाजण्याऎवजी मला पराठा भाजताना तेलावर भाजून मग एकदम शेवटी थोडेसे तूप सोडायला जास्त आवडतो
0 comments:
Post a Comment