कोबीचे पॅटिस
सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आई बाबांची इथली ट्रीप, नंतर आमची भारताची ट्रीप ह्या सगळ्यामुळे गेल्या बऱ्याच महिन्यांमध्ये मला खूपच कमी वेळा सकाळचा नाश्ता बनवण्याची संधी होती. त्यातच आताचा जेटलॅग त्यामुळे सकाळचा नाश्ता हि प्रयोगाची उत्तम वेळ ठरते. इथे आहे माझी पहिली कृती.
साहित्य
२ वाटी कोबी
२ बटाटे
२ चमचे कॉर्नफ्लोर
१/४ वाटी रवा
१/२ चमचा जीरा
२-३ लसुणाच्या पाकळ्या
मीठ चवीपुरते
तेल
कृती
- बटाटे कुकरमध्ये शिजवून थंड होण्यासाठी ठेवून देणे.
- तव्यावर तेल गरम करून जीऱ्याची फोडणी करणे.
- त्यात बारीक चिरलेले लसूण आणि कोबी घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
- एका ताटलीत बटाटा किसून त्यात कॉर्नफ्लौर आणि मीठ घालुन मळणे.
- २-३ थेंब तेल शिंपडून पुन्हा मळणे व त्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे करणे.
- प्रत्येक गोळा दाबून वाटी बनवणे व आधी बनवलेले कोबीचे मिश्रण अर्धा चमचा प्रत्येक वाटीत घालुन गोळे बंद करणे. थोडे दाबून पॅटिस बनवणे
- प्रत्येक पॅटिस रव्यात घोळवून तव्यावर थोडे थोडे तेल घालुन दोन्ही बाजूनी भाजणे.
टीप
मला कोबीचे मिश्रण फार मसालेदार न बनवता त्याला लसूण आणि जीऱ्याची चव द्यायची होती. पण तुम्ही तुमच्याचवीनुसार मसाले घालुन प्रत्येक वेळी वेगवेगळ्या चवीचे पॅटिसपण बनवू शकतात.
0 comments:
Post a Comment