ब्रेडचे दही वडे
अजॉय जेंव्हा घरी ब्रेड घेऊन आला तेंव्हा मी माझ्या ठरलेल्या नवीन वर्षाच्या नवीन उपक्रमानुसार तो तसाच न खाता काहीतरी नवीन बनवण्याचे ठरवले. हा चविष्ठ वडा करायला एकदम सोपा आहे.
साहित्य
८ ब्रेडचे स्लाईसेस
२.५ वाटी दही
२ हिरव्या मिरच्या
४ लसूण पाकळ्या
३ चमचे साखर
१/४ चमचा मिरे
चिमुटभर तिखट
चिमुटभर चाट मसाला
मुठभर कोथिंबीर
मीठ
तेल
कृती
- ब्रेड पाण्यात भिजवून लगेच हातावर ठेवून दाबून त्यातील पाणी काढून टाकावे.
- परातीत ब्रेड, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि लसूण, मिरे पूड आणि मीठ घालुन मळून घ्यावे.
- लिंबाच्या आकाराचे गोळे करून ते गरम तेलात भाजून घ्यावे.
- एका भांड्यात दही, साखर, तिखट, चाट मसाला आणि मीठ घालुन ढवळून घ्यावे.
- प्लेटमध्ये वडे घालुन त्यावर दही पसरवावे व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन खायला देणे
टीप
सगळे वडे लगेच खायचे नसतील तर ब्रेडचे मळलेले मिश्रण ठेवून खायच्या आधी तळावे नाहीतर तळलेले वडे ठेवल्यास ते रबरी होतात.
0 comments:
Post a Comment