मेदू वडा
मेदू वडा हा माझा आवडता पदार्थ. घरात संध्याकाळी यायचे पाहुणे दुपारी कळले तर बनवायला एकदम उत्तम.
साहित्य
२ वाटी उडीद डाळ
२ हिरव्या मिरच्या
४ खोबऱ्याचे तुकडे
१ कांदा
मीठ
कृती
- डाळ धुवून ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवणे.
- जास्तीचे पाणी ओतून डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
- त्यात मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा आणि खोबरे घालुन एकत्र करणे.
- कढईत तेल गरम करून वडे मंद आचेवर भाजणे.
टीप
डाळ वाटल्याबरोबर लगेच वडे तळणे नाहीतर ते फार तेलकट होतात
वडे तेलात घातल्यावर ते तरंगायला पाहिजेत नाहीतर पिठात थोडे पाणी घालुन हलके करणे.
ह्यात आले पण घालता येते पण मला वाड्यात ते फारसे आवडत नसल्यानी मी वापरले नाही
0 comments:
Post a Comment