Dec 2008
16
मेदू वड्यासाठी चटणी
माझ्याकडच्या पुस्तकात वाचून मी हि चटणी केली आणि एकदम मस्त झाली. वड्याबरोबर एकदम उत्तम (अर्थातच मला वडा सांबार जास्त आवडत असल्यानी मी त्याची आठवण काढली).

साहित्य
१/२ नारळ
१/४ वाटी फुटाणे डाळ
६ हिरव्या मिरच्या
१ कोथिंबीर
१/२ वाटी दही
१/२ चमचा म्हवरी
१/२ चमचा उडीद डाळ
चिमुटभर हिंग
१ चमचा तेल
मीठ
कृती
- नारळ खवून घेणे व हिरवी मिरची, कोथिंबीर, फुटाणे डाळ आणि मीठ घालुन मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
- ह्या मिश्रणात दही घालुन एकत्र करणे.
- कढईत ते; गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे व त्यात हिंग घालणे.
- फोडणी चटणीत घालुन एकत्र करणे.
टीप
मी नारळाचे पाणीच नारळ मिश्रण वाटण्यासाठी वापरले त्यामुळे एकदम छान लागले आणि वेगळी साखर घालावी लागली नाही
तेलात लाल मिरची पण घालता येईल पण माझ्याकडे ती नसल्यानी मी नाही वापरली
0 comments:
Post a Comment