Showing posts with label फराळ. Show all posts
Showing posts with label फराळ. Show all posts

साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा


हा चिवडा इतका सोपा आणि हमखास चांगला होणारा प्रकार. मी जेंव्हा लहान होते तेंव्हा मला हा चिवडा फार आवडायचा. एकदम हलका, तिखट गोड असा हा चिवडा आता मला आणखीनच आवडतो तो त्याच्या बनवायच्या सोप्या कृती मुळे. मी आता हा नियमित करत जाणार आहे.

साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा
साहित्य
१०० ग्राम साबुदाणा पोहे
१ वाटी शेंगदाणे
२.५ चमचा तिखट
१ चमचा जिरे पूड
१ चमचा साखर
१ चमचा मीठ
तेल

कृती
  • मिक्सरमध्ये तिखट, जिरे पूड, साखर, मीठ घालुन बारीक पूड होईपर्यंत वाटून घेणे व मोठ्या भांड्यात घालणे
  • कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे गुलाबी रंगावर तळून घेणे. मसाल्यात घालुन हलवून घेणे.
  • त्याच तेलात थोडे थोडे पोहे घालुन तळणे. प्रत्येक वेळी तळल्या तळल्या लगेच मसाल्यात घालुन हलवणे.

टीप
पोहे तळून झाल्यावर गरम गरमच मसाल्यात घालणे फार महत्वाचे आहे नाहीतर मसाला त्यांना नीट लागत नाही.

कडबोळी


दिवाळी होऊन बरेच महिने झाले तर मग आज कडबोळी? पण वेफर्सपेक्षा कडबोळी खाता खाता वर्डकप बघायला मजा येईल असा वाटल्यावर रविवारी रात्री उशिरा मी त्यांना बनवायला घेतलं. लवकरच असा लक्षात आला की एक एक कडबोळी बनवायला खूप वेळ लागत होता मग मी त्यावर एक उपाय शोधला. चकलीच्या पात्रात एक मध्ये छोटी भोक असलेली ही चकती घालुन छोटे छोटे तुकडे तळले आणि ते सिनेमा किंवा खेळ बघताना खाण्यासाठी एकदम छान जमून आले.

कडबोळी
साहित्य
४ वाटी तांदुळाचे पीठ
३ वाटी दुध
१ वाटी लोणी
मीठ चवीपुरते
तेल

कृती
  • तांदुळाच्या पिठात लोणी घालुन चांगले एकत्र करणे.
  • त्यात दुध घालुन पिठाचा गोळा बनवणे.
  • छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन पोलपाटावर वळवत लांबट दोरीचा आकार देणे व नंतर गोल वळवून तेलात गुलाबी रंगावर तळणे.
  • किंवा चकलीच्या पात्रात ते पीठ घालुन छोटे छोटे तुकडे तेलात घालुन भाजणे.

टीप
कडबोळी भाजताना गुलाबी झाल्या झाल्या लगेच काढावी नाहीतर करपून जातील कारण तेलातून काढल्यानंतर त्यांना थोड्यावेळानी अजून थोडा रंग चढतो.

जाड पोह्याचा चिवडा


चिवडा हा सगळ्यांची कमजोरी आहे :) ह्या प्रकारचा चिवडा आमच्या घरी फार वेळा करतात, पातळ पोह्यापेक्षासुद्धा जास्त.

जाड पोह्याचा चिवडा
साहित्य
२ वाटी जाड पोहे
२.५ चमचा तिखट
१/४ चमचा तीळ
१/४ चमचा जीरा
१/२ वाटी शेंगदाणे
१/४ वाटी फुटाणे डाळ
१.५ चमचा साखर
७-८ कडीपत्ता पाने
४ चमचे काजू
४ चमचे मनुका
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
मीठ
तेल

कृती
  • जीरा आणि तीळ एकत्र कमी आचेवर तेलाविना साधारण ३-४ मिनिट भाजून घेणे.
  • मिक्सरमध्ये जीरा, तीळ आणि साखर एकत्र पूड करणे.
  • एका मोठ्या भांड्यात ती पूड, २ चमचा तिखट, काजू, मनुका आणि मीठ एकत्र करणे.
  • कढईत मध्यम आचेवर तेल गरम करणे.
  • पोहे एकावेळी थोडे थोडे करून तळून घेणे.
  • तेलातून काढल्या काढल्या लगेच टिशू वर तेल शोषून घेण्यासाठी ठेवावे. २-३ भाग टिशूवर आले की त्यांना मसाल्याच्या मिश्रणात घालुन ढवळणे.
  • सगळे पोहे तळून झाल्यावर एक दोन चमचा तेल गरम करावे व त्यात शेंगदाणे तळून घेणे.
  • त्याच तेलात म्हवारीची फोडणी करणे व त्यात हिंग, कडीपत्ता आणि फुटाणे डाळ घालुन २ मिनिट तळून घेणे.
  • त्यात शेंगदाणे आणि उरलेले १/२ चमचा तिखट घालुन चिवड्यात घालणे व ढवळणे.

टीप
कढईत थोडे थोडे तेल घालूनच पोहे तळावे कारण तेल काळे पडते त्यामुळे जास्त तेल वाया नाही जात
तेलात गाळणी ठेवून त्यात पोहे घातल्यानी ते बाहेर काढायला सोप्पे जाते
मी पोह्याचे तेल शोषून घेण्यासाठी त्यांना टिशूवर काढले पण पोहे गरम असतानाच मसाल्यात घालावे नाहीतर मसाला त्यांना नीट चिकटत नाही.

चकली


ह्या दिवाळीला मी थोडा फराळ करण्याचे ठरवले. त्याची तयारी आईकाढून त्याच्या कृती घेण्यापासून झाली. जेंव्हा मी चकलीची कृती पहिली, मला विश्वास नव्हता की ती बनवणे इतके सोप्पे आहे.

चकली
साहित्य
२ वाटी तांदुळाचे पीठ
१ चमचा मैदा
१/२ चमचा तिखट
१/४ चमचा तील
१/४ चमचा ओवा
१/४ वाटी लोणी
तेल
मीठ

कृती
  • तांदुळाचे पीठ, मैदा, तीळ, ओवा, तिखट आणि मीठ एकत्र करणे.
  • त्यात लोणी घालुन चांगले मळणे.
  • पाणी घालुन मऊ पीठ भिजवणे.
  • त्यातला अर्धा भाग चकलीच्या पत्रात घालणे.
  • तेल उंच आचेवर गरम करणे व लगेच आच मध्यम करून त्यात चकली बनवून तळणे.
  • दोन्ही बाजूनी गुलाबी झाल्यावर चकली तेलातून काढणे. उरलेल्या चकल्या तळताना तेल चांगले गरम असल्याची खात्री करणे.
  • चकल्या थंड झाल्यावर एअर टाईट डब्यात ठेवणे.

टीप
जर घरचे लोणी वापरायचे असेल तर थंड पाण्यानी ते धुवून घ्यावे.
चकली गुलाबी असतानाच बाहेर काढावी कारण नाहीतर ती करपेल.

शेव


एकदम सोपी आणि चविष्ठ पाककृती. अजॉयला खूप आवडली :)

शेव
साहित्य
१ वाटी तेल
१ वाटी पाणी
४ वाटी बेसन
हळद
तिखट
ओवा
मीठ
तेल भाजायला

कृती
  • तेल आणि पाणी एका पातेल्यात व्यवस्तीथ मिसळणे
  • ब्लेन्डरनी पांढरा फेस येई पर्यंत मिसळणे
  • त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद, तिखट, ओवा घालुन पुन्हा ढवळणे
  • बेसन हळू हळू घालुन एकत्र करणे
  • मिश्रण चकली पत्रात घालणे आणि शेवाची जाळी लावणे
  • तेल गरम करून त्यात शेव घालुन मध्यम आचेवर भाजणे

टीप
बेसनाचे मिश्रण भजीपेक्षा थोडे दाट करणे
लसूण शेव करण्यासाठी शेवाच्या मिश्रणात चवीप्रमाणे लसूण वाटून तिखटाबरोबर घालणे

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP