शेव
एकदम सोपी आणि चविष्ठ पाककृती. अजॉयला खूप आवडली :)
साहित्य
१ वाटी तेल
१ वाटी पाणी
४ वाटी बेसन
हळद
तिखट
ओवा
मीठ
तेल भाजायला
कृती
- तेल आणि पाणी एका पातेल्यात व्यवस्तीथ मिसळणे
- ब्लेन्डरनी पांढरा फेस येई पर्यंत मिसळणे
- त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद, तिखट, ओवा घालुन पुन्हा ढवळणे
- बेसन हळू हळू घालुन एकत्र करणे
- मिश्रण चकली पत्रात घालणे आणि शेवाची जाळी लावणे
- तेल गरम करून त्यात शेव घालुन मध्यम आचेवर भाजणे
टीप
बेसनाचे मिश्रण भजीपेक्षा थोडे दाट करणे
लसूण शेव करण्यासाठी शेवाच्या मिश्रणात चवीप्रमाणे लसूण वाटून तिखटाबरोबर घालणे
0 comments:
Post a Comment