पनीर पराठा


मागच्या आठवडयात मी पनीर पराठे करून बघितले. मस्त जाले होते. इथे त्याची पाककृती देत आहे.
पनीर पराठा
साहित्य
२००ग्राम पनीर
१ चमचा तिखट
१ चमचा जीरा पुड
१ चमचा धने पुड
१ चमचा आमचूर पुड
५ चमचेभरून गव्हाचे पीठ
मीठ
तेल

कृती
  • चपाती बनवतात तसे गव्हाचे पीठ चांगले मळून भिजवावे.
  • पनीर किसून बाजूला ठेवणे
  • त्यामध्ये तिखट, जीरा पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घालुन नीट मिसळणे.
  • दोन मध्यम आकाराच्या चपाती लाटणे
  • एका चपातीवर पनीरचे मिश्रण पसरवणे
  • चपातीच्या पूर्ण टोकावर पाण्याचे बोट लावणे
  • त्यावर दुसरी चपाती ठेवून पराठा बंद करणे
  • पराठा हलक्या हातानी थोडा लाटणे
  • तव्यावर तूप किंवा तेल लाऊन भाजणे.

टीप
पनीरच्या मिश्रणात मीठ घालुन खूप वेळ ठेवले तर मिश्रणाला पाणी सुटते त्यामुळे शक्यतो पराठे लाटण्याच्या पूर्वी मिश्रण बनवणे

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP