हिरवी पाचक लस्सी


थोड्या दिवसांपूर्वी मी पेपरमध्ये एक लेख वाचला तेंव्हा मला ह्या कृतीची आयडिया आली.

हिरवी पाचक लस्सी
साहित्य
१.५ वाटी दही
१/२ वाटी पुदिना
१ वाटी कोथिंबीर
१ काकडी
१/४ वाटी कोबी
चिमुटभर काळे मीठ
२ चमचा साखर

कृती
  • काकडी आणि कोबी एकत्र किसणे.
  • दही, पुदिना, कोथिंबीर, काकडी, कोबी, काळे मीठ, साखर आणि ५-६ बर्फ एकत्र ५ मिनिट मिक्सरमध्ये वाटणे.
  • थंड करून प्यायला देणे.

टीप
मी जाड दुध वापरून दही बनवले पण जर साध्या दुधाचे दही वापरले तर बर्फ थोडा कमी घालणे.

श्रीखंड


हा आम्रखंडसारखा आणखीन एक चक्क्याचा पदार्थ.

श्रीखंड
साहित्य
१/२ लिटर दुध
३/४ वाटी साखर
चिमुटभर केशर
१ चमचा दुध पूड
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर दालचिनी पूड
२ चमचे नारिंगी रंग
५-६ बदाम
१० पिस्ता

कृती
  • Warm the milk
  • दुध कोमट करून त्यात दही एकत्र करून ६-८ तास गरम जागी ठेवून दही लावणे.
  • पंचावर दही ओतून ते टांगून ८-१० ठेवणे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल व चक्का तयार होईल.
  • चक्क्यात साखर घालुन दोन तास ठेवणे.
  • १/४ वाटी पाणी गरम करून त्यात दुधाची पूड, केशर, दालचिनी पूड, वेलची पूड घालुन एकत्र करणे.
  • हे मिश्रण चक्क्यात घालुन पुरण यंत्रातून फिरवणे
  • त्यात बदाम आणि पिस्ते घालुन खायला देणे.

टीप
साखर चक्क्यात एकत्र करून ठेवल्यानी चांगली एकत्र होते नाहीतर दही आंबट होऊन साखर वेगळी राहते.
दुधाच्या पूड मध्ये पाणी घालुन मिश्रण बनवण्याऎवजी १/४ वाटी दुध वापराता येईल पण माझ्याकडचे दुध संपल्यानी मी दुधाची पूड वापरली

दडपे पोहे


जेंव्हा मला पटकन होणारा पण चविष्ठ पदार्थ नाश्त्यासाठी बनवण्याची इच्छा होते तेंव्हा हा पदार्थ मनात येतो

दडपे पोहे
साहित्य
३.५ वाटी पातळ पोहे
१ कांदा
२ टोमाटो
१ चमचा साखर
१.५ लिंबू
१/२ वाटी शेंगदाणे
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जिरे
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा हळद
१ चमचा तेल
मीठ

कृती
  • पातळ पोह्यात टोमाटो आणि कांदा बारीक चिरून घालणे.
  • त्यात साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालुन चांगले एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घेणे व ते पोह्यात घालणे.
  • त्याच तेलात म्हवरी, जीरा, मिरच्यांचे तुकडे घालुन फोडणी करणे व त्यात हळद घालणे.
  • फोडणी पोह्यात घालुन ढवळणे व खायला देणे.

टीप
ह्यात पोह्यांना धुवायचे नसते कारण ते खूप पातळ असल्यानी लिंबाचा आणि टोमाटोचा रस त्यांना मऊ करण्यासाठी पुरेसा असतो.

मसालेदार बिर्यानी


मागच्यावेळी केलेली बियाणी आमच्या कडे काम करणाऱ्या बाईंच्या सांगण्याप्रमाणे केलेली. पण आज मी एका पुस्तकात वाचून हि केलेली बिर्यानी अजूनही सुंदर आणि चविष्ठ आहे.

मसालेदार बिर्यानी
साहित्य
४ चिकनचे लेग
२ वाटी तांदूळ
१ वाटी दही
४ कांदे
२ टोमाटो
१/४ वाटी दुध
१ बटाटा
मुठभर काजू
५-६ बदाम
२ चमचे तेल
१ चमचा पुदिना पाने
१ चमचा सुके खोबरे
२ वेलची
२ लवंग
३ दालचिनी
१ चमचा जीरा
१ चमचा धने
१ चमचा तिखट
१/४ चमचा मिरे पूड
१/२ चमचा खसखस
१/४ चमचा बडीशेप
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा आले
१ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
चिमुटभर केशर
मीठ

कृती
  • एका भांड्यात दही, हळद, गरम मसाला, १/२ चमचा लसूण पेस्ट, १/४ चमचा आले पेस्ट आणि मीठ एकत्र करणे.
  • चिकनचे तुकडे त्यात घालुन चांगले एकत्र करणे. फ्रीजमध्ये कमीत कमी ८ तास ठेवून देणे.
  • तांदूळ कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घेणे.
  • ३-४ चमचे पाण्यात खसखस भिजवणे.
  • कोमट दुधात केशर घालुन बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून थंड करून त्याच्या साली काढून चकत्या करणे व बाजूला ठेवणे.
  • २ कांदे पातळ उभे चिरून तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळणे.
  • त्याच तेलात ५-६ काजू बाजूला ठेवून बाकीचे तळून घेणे.
  • उरलेले कांदे बारीक कापून तेलात गुलाबी रंगावर भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात २ दालचिनी, धने, जिरे, सुके खोबरे, बडीशेप, काजू आणि बदाम घालुन तळणे.
  • त्यात तिखट, मिरे पूड, खसखस, पुदिना पाने आणि आधी भाजलेला बारीक कांदा घालणे व भाजणे. मिश्रण थंड करणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये अर्धा टोमाटो सहित वाटणे.
  • २ चमचा तूप बाजूला ठेवून उरलेले गरम करणे व त्यात हा वाटलेला मसाला खमंग भाजून घेणे.
  • त्यात उरलेली आले पेस्ट, लसूण पेस्ट, बारीक चिरलेले टोमाटो आणि मीठ घालुन भाजणे.
  • त्यात चिकन त्याच्या मासाल्यासाहित घालुन पूर्ण सुकेपर्यंत भाजणे.
  • ग्रेव्हीतून बरेच तूप बाजूला सुटेल ते गाळून वेगळे करणे.
  • चिकन शिजत असताना ७ वाटी पाणी उकळून त्यात तांदूळ घालुन त्यावर झाकणी ठेवून अर्धवट शिजवून घेणे. उरलेले पाणी गाळून टाकणे व थंड पाण्याखाली भात धुवून घेणे व बाजूला ठेवणे.
  • १/२ चमचा तूप गरम करून त्यात उरलेले दालचिनी, लवंग, वेलची घालुन तळणे व भातावर सोडणे. त्यात मीठ घालुन चांगले एकत्र करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून बटाट्याच्या चाकात्यांचा थर लावणे.
  • भाताचा १/३ भाग बटाट्यावर पसरवणे. त्यावर तळलेले १/३ काजूचा वाटा, तळलेल्या कांद्याचा १/३ वाटा आणि अर्धे चिकन पसरणे.
  • पुन्हा १/३ भाताचा वाटा, १/३ भाग काजू, १/३ भाग कांदा आणि उरलेले चिकन पसरवणे
  • वरून उरलेला भात पसरवणे व त्यावर उरलेले काजू आणि कांदा पसरवणे.
  • परतणीच्या मागच्या बाजूनी पूर्ण थरातून जाईल अशी ५-६ भोके पाडणे.
  • चिकनमधून वेगळे केलेले तूप, केशर दुध वरून ओतणे.
  • मंद आचेवर तवा ठेवून त्यावर हा कुकर बंद करून ठेवणे व १५ मिनिट शिजवणे व नंतर गरम गरम रायत्यासोबत खायला देणे.

टीप
थोडी मोठी कृती आहे पण इतकी चविष्ठ बिर्यानी बनते की कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल
बटाटे कुकर मध्ये खाली लावल्यानी भात खालून करपणार नाही.
सगळे पदार्थ आधीच शिजवून मग त्याचे थर लावल्यानी चिकन किंवा भात अर्धवट कच्चे राहण्याची चूक होऊ शकत नाही.

लस्सी


पुण्यात असताना अप्पा बळवंत चौकावरच्या डेरीची लस्सी फार आवडायची. हि एकदम त्यासारखी बनते

लस्सी
साहित्य
१/२ लिटर दुध
२ चमचा दुध पूड
१ चमचा कॉर्न फ्लौर
१ चमचा दही
३ चमचा साखर
४-५ बर्फ

कृती
  • अर्धा वाटी दुधात दुध पूड आणि कॉर्न फ्लौर एकत्र करणे.
  • उरलेले दुध सारखे ढवळत उकळवणे.
  • त्यात दुध-कॉर्न फ्लौर-दुधाची पूड मिश्रण घालणे व अजून ४-५ मिनिट उकळवणे.
  • मिश्रण कोमट होईपर्यंत थंड करणे व दह्यात एकत्र करून दही बनवण्यासाठी ठेवणे.
  • दही तयार झाले की त्यात बर्फ, साखर घालुन ४-५ मिनिट मिक्सरमध्ये वाटणे व थंड करून प्यायला देणे.

टीप
दुध उकळवताना सारखे ढवळणे आवश्यक आहे व साय तयार होऊ देऊ नये.
मी जाड दुध वापरून दही लावले त्यामुळे दही एकदम घट्ट लागले.

टोमाटो थंडाई


अजून एक उन्हाळ्यासाठी उत्तम पेय्य. हे मी एका मासिकात वाचलेले आणि माझ्या चवीप्रमाणे थोडा बदल करून बनवले.

टोमाटो थंडाई
साहित्य
१/२ वाटी कंडेन्स्ड दुध
३ वाटी दुध
२ टोमाटो
२ चमचे खसखस
१/२ चमचा बडीशेप
१/२ चमचा साखर
१५ बदाम

कृती
  • टोमाटो मिक्सरमध्ये वाटणे व गाळून फ्रीजमध्ये ठेवणे.
  • २ चमचे पाण्यात खसखस भिजवून अर्धा तास ठेवणे.
  • खसखस, बडीशेप आणि १/२ वाटी दुध एकत्र वाटणे व फ्रीजमध्ये ठेवणे.
  • उरलेले दुध, कंडेन्स्ड दुध आणि साखर एकत्र बारीक वाटणे व फ्रीजमध्ये ठेवणे.
  • प्यायला देताना टोमाटो, खसखस-बडीशेप मिश्रण आणि दुध एकत्र करून ढवळणे व बारीक केलेल्या बर्फावर ओतून देणे.

टीप
मी कंडेन्स्ड दुध वापरल्यामुळे अर्धा चमचा साखर वापरली पण जर दुध गोड नसेल तर त्यात अजून साखर वापरणे.

कलिंगडाची लस्सी


उन्हाळ्याची गरमी वाढल्यापासून मी फळाचा ज्यूस आणि बाकीचे थंडगार पेय्ये बनवतीये. हे त्यातील एक.

कलिंगडाची लस्सी
साहित्य
३ वाटी कलिंगड
१.५ वाटी दही
३ चमचा साखर
२ चिमुट मिरे पूड
मीठ

कृती
  • कलिंगडाच्या बिया काढून टाकणे.
  • कलिंगड, दही, साखर, मिरे पूड आणि मीठ एकत्र वाटणे.
  • मिश्रण घट्ट असेल तर त्यात थोडा बर्फ घालुन अजून थोडे वाटणे. थंडगार प्यायला देणे.

टीप
मी जाड दुधाचे गोड दही वापरले.

केळ्याचे पेन केक


आज ३ पिकलेले केळे बघून मला ह्या कृतीची आठवण झाली. थोड्या दिवसांपूर्वी मी एक लेख वाचलेला आणि तेंव्हापासून मला हे कसे लागेल अशी उत्सुकता होती. एकदम चविष्ठ आणि नेहमीच्या नाश्त्यापेक्षा एकदम वेगळा.

केळ्याचे पेन केक
साहित्य
३ केळे
२ अंडी
१ वाटी मैदा
१ वाटी दुध
१ चमचा बेकिंग पूड
२ चमचा साखर
४ चमचा मध
२ चमचा तेल
मीठ
तूप

कृती
  • मैदा, बेकिंग पूड आणि मीठ एकत्र चाळणे
  • अंडी, साखर आणि तेल एकत्र फेटणे.
  • त्यात थोडे थोडे मैद्याचे मिश्रण आणि दुध घालत एकत्र करणे
  • २ केळी कुस्करून त्या पिठात एकत्र करणे.
  • तवा गरम करून त्याला तूप लावणे व त्यावर मंद आचेवर जाड डोसे बनवणे व दोन्ही बाजूनी गुलाबी रंगावर भाजणे.
  • मध आणि केळ्याचे तुकडे वरून घालुन खायला देणे.

टीप
अंड्यामुळे केक एकदम छान फुगतात व तव्याला चिकटत नाही
नेहमीच्या भारतीय नाश्त्यापेक्षा वेगळा नाश्ता.

भोपळ्याची पुरी


थोड्या दिवसांपूर्वी आई इथे आली असताना तिनी अश्या पुऱ्या बनवलेल्या आणि मला त्या फार आवडलेल्या. आज मी स्वतः बनवल्या आणि इथे कृती देत आहे

भोपळ्याची पुरी
साहित्य
२ वाटी भोपळा
३/४ वाटी गुळ
३ वाटी गव्हाचे पीठ
मीठ
तेल

कृती
  • भोपळ्याचे साल काढून किसून घेणे.
  • २ चमचे तेल गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घालुन मध्यम आचेवर ५ मिनिट शिजवणे.
  • आचेवरून बाजूला करून त्यात किसलेले गुळ घालुन एकत्र करणे.
  • मिश्रण थंड झाले की त्यात मीठ, गव्हाचे पीठ घालुन घट्ट पीठ मळणे.
  • पुऱ्या लाटून तळणे.

टीप
ह्या पुऱ्या थोडे दिवस ठेवता येतात त्यामुळे प्रवासात खायला चांगला पदार्थ आहे.

चॉकोचीप कुकी


ह्या आधी मी जेंव्हा ह्या कुकीज बनवलेल्या तेंव्हा चवीला चांगल्या झालेल्या पण १० कुकीजच्याऎवजी १ मोठं पिझाच्या आकाराची कुकी झालेली. आज एकदम बरोबर झाल्या म्हणून कृती देत आहे

चॉकोचीप कुकी
साहित्य
१ वाटी लोणी
३/४ वाटी साखर
३/४ वाटी ब्रावून शुगर
१ अंडे
२.५ वाटी मैदा
३/४ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा मीठ
२०० ग्राम कॅडबरी

कृती
  • लोणी, साखर, ब्रावून शुगर आणि अंडे एकत्र फेटणे.
  • मैदा, बेकिंग पूड आणि मीठ दोन वेळा एकत्र चाळून घेणे
  • मैद्याचे मिश्रण एका वेळी चार-चार चमचे अंडे आणि लोण्याच्या मिश्रणात घालत एकत्र करणे.
  • कॅडबरीचे बारीक तुकडे करून ते मिश्रणात एकत्र करणे.
  • ओव्हन २५०C वर गरम करणे.
  • तव्याला लोण्याचा हात लावून त्यावर छोट्या छोट्या आकाराच्या कुकी करून २ इंच जागा ठेवत पसरवणे.
  • ओव्हनमध्ये २५०C वर १० मिनिट भाजणे व नंतर थंड झाल्यावर डब्यात भरणे.

टीप
कुकी भाजताना त्या पसरतात त्यामुळे थोड्या जाड थापणे आणि त्यांच्या २ इंच जागा ठेवणे आवश्यक आहे नाहीतर त्या पातळ होतील किंवा एकमेकांना चिकटतील.
ब्रावून शुगर वापराल्यानी कुकी चांगल्या गुलाबी रंगाच्या बनतात

केळे फ्राय


मला जेव्हा काहीतरी पटकन आणि चटपट बनवायचे असते तेंव्हा मी हि भाजी बनवते. वरण भाताबरोबर एकदम मस्त जाते हि भाजी

केळे फ्राय
साहित्य
२ कच्ची केळी
१ चमचा जीरा
१ चमचा तिखट
१/४ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचे हळद
१/२ चमचा पिठी साखर
२ चमचा कोथिंबीर
मीठ
तेल/तूप

कृती
  • केळ्यांची साले काढून त्यांचे चौकोनी तुकडे करणे.
  • कढईत तेल/तूप गरम करून त्यात जिरे घालुन फोडणी करणे.
  • त्यात केळ्यांचे तुकडे, तिखट, जिरे पूड, धने पूड, हळद आणि पिठी साखर घालुन केळी शिजेपर्यंत परतत भाजणे.
  • वरून मीठ आणि कोथिंबीर घालुन वाढणे.

टीप
ह्यात थोडी आमचूर पूड घालुन थोडी आंबट चव देता येईल
कढई गॅसवरून उतरवताना भाजीत चमचाभर तूप सोडणे म्हणजे भाजी सुकी लागत नाही.

व्हेज नर्गीसी कबाब


हा पूर्ण व्हेज नसलातरी जे लोक व्हेज व्ह्यातिरिक्त फक्त अंडी खातात त्याच्यासाठी एकदम मस्त पदार्थ आहे. अर्थातच नॉनव्हेज लोक तर खाऊ शकतीलच. मी पुस्तकात ह्या कबाब विषयी वाचलेले आणि आधी मटणाच्या खिम्याचे बनवलेलेपण आज काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात हे तयार झाले.

व्हेज नर्गीसी कबाब
साहित्य
६ अंडी
५ बटाटे
१ चमचा कॉर्न फ्लौर
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
  • अंडी उकडून त्यांची साले काढून बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून त्यांचा कीस करणे.
  • चमचाभर तेल गरम करून त्यात गरम मसाला, लसूण पेस्ट, तिखट, जिरे पूड आणि धने पूड घालणे.
  • त्यात किसलेला बटाटा घालुन एक मिनिट परतणे.
  • मिश्रण कोमट झाले की त्यात कॉर्न फ्लौर घालुन मळणे.
  • मिश्रण ६ भागात करून प्रत्येकाचा गोळा करून त्याला वाटीचा आकार देणे.
  • प्रत्येक वाटीत एक अंडे घालुन वाटी बंद करणे व तेलात गुलाबी रंगावर तळणे.

टीप
मिश्रण मळताना हाताला तेल लावणे म्हणजे ते चिकटत नाही
किसलेला फ्लावर बटाट्याच्या मिश्रणात घालुन मी थोडा वेगळा चावीचा प्रयोग करून बघणार आहे

मटार पॅटिस


सकाळच्या नाष्ट्यासाठी झटपट आणि चटपट पदार्थ बनवण्यासाठी मी हे पॅटिस बनवले.

मटार पॅटिस
साहित्य
१ वाटी मटार
४ बटाटे
२ चमचा कॉर्न फ्लौर
१/४ चमचा लसूण पेस्ट
चिमुटभर आले पेस्ट
चिमुटभर हळद
१/४ चमचा तिखट
१/२ लिंबू
मीठ
तेल

कृती
  • बटाटे उकडून थंड झाल्यावर किसून घेणे.
  • त्यात कॉर्न फ्लौर घालुन मळणे. त्याला थोडे तेल लावणे व बाजूला ठेवणे.
  • मटार उकळवून त्यातले पाणी काढून टाकणे.
  • त्यात हळद, आले पेस्ट, लसूण पेस्ट, तिखट, लिंबाचा रस आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • लिंबाच्या आकाराचा बटाट्याचा गोळा करून त्याची वाटी करणे व त्यात चमचाभर मटारचे मिश्रण घालुन बंद करणे. अलगद दाबून पसरट पॅटिस बनवणे
  • तेलात मध्यम आचेवर तव्यावर भाजणे.

टीप
मटार पॅटिस तळताना तेल एकदम गरम असले पाहिजे नाहीतर बटाट्याचे मिश्रण तव्याला चिकटते
तव्याच्या ऎवजी कढईत पण टाळता येईल

गुलाबजाम


आधी मी गिट्सची पाकिटे वापरून गुलाबजाम बनवायचे पण सगळ्यात त्रास व्हायचा तो पाक बरोबर बनवण्याचा. आज मी खव्याचे गुलाबजाम बनवायचे ठरवल्यावर थोडी शोधाशोध करून काय चुकत होते ते समजून घेतले.

गुलाबजाम
साहित्य
१/४ किलो खवा
१ वाटी रवा
१/२ वाटी दुध
२ चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर खाण्याचा सोडा
२ वाटी साखर
३ वाटी पाणी
तेल/तूप

कृती
  • रवा आणि दुध एकत्र करून चपातीसाठी भिजवतो तसे पीठ भिजवणे व २ तास भिजण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • त्यात खवा मिसळणे व चांगले मळणे व मिश्रण पुरण यंत्रातून फिरवणे.
  • त्यात चिमुटभर वेलची पूड घालुन मळणे व छोटे छोटे गोळे बनवणे.
  • कढईत साखर, पाणी एकत्र करून मध्यम आचेवर उकळवणे.
  • पाक उकळल्यावर त्यात चिमुटभर वेलची पूड घालुन अजून एक मिनिट उकळवणे व बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात ४-५ गुलाब जाम एकावेळी मंद आचेवर तळणे.
  • गुलाबी झाले की ते बाजूला ठेवणे व नंतरचे ४-५ गुलाब जाम तळणे. ते गुलाबी होत आले की आधीचे गुलाबजाम पाकात घालणे.
  • सगळे गुलाबजाम पाकात घाताळूयावर मिश्रण मंद आचेवर अजून एकदा उकळवणे व ५-६ तास बाजूला ठेवणे.

टीप
गुलाबजाम तेलात टाकल्यावर ते एका मिनिटात तरंगायला पाहिजे नाहीतर मिश्रणात चुइमुभर सोडा घालुन पुन्हा मळणे
पाकात गुलाबजाम घातल्यावर ते तरंगायला पाहिजेत नाहीतर ते व्यवस्थित तळले गेले नाहीयेत

कॉर्न चाट


हा पदार्थ मी थोड्या वेगवेगळ्या कृती एका पुस्तकात वाचून बनवला

कॉर्न चाट
साहित्य
१/४ वाटी मैदा
१/४ वाटी रवा
१/२ चमचा दही
चिमुटभर बेकिंग पूड
२ वाटी कॉर्न
२ टोमाटो
२ कांदे
१ लिंबू
१ चमचा आले लसूण पेस्ट
चिमुटभर गरम मसाला
कोथिंबीर
शेव
मीठ
तेल

कृती
  • रवा, मैदा, बेकिंग पूड आणि मीठ एकत्र करणे.
  • दही आणि चमचाभर तेल कोमट करणे.
  • ते मिश्रण रव्यात घालुन त्याचे पीठ भिजवणे.
  • बारीक व पातळ पुऱ्या लाटून तेलात तळणे.
  • तेल गरम करून त्यात १/२ टोमाटो किसून, १/२ कांदा किसून घालणे व शिजवणे.
  • त्यात आले लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट आणि मीठ घालुन ढवळणे.
  • त्यात कॉर्न घालुन शिजवणे.
  • कांदा आणि टोमाटो बारीक चिरणे.
  • मध्यम आकाराच्या ताटलीत पुऱ्या पसरवणे, त्यावर कॉर्नचे मिश्रण, बारीक चिरलेला कांदा, टोमाटो पसरवणे.
  • लिंबू पिळणे व त्यावर कोथिंबीर व शेव पसरवून वाढणे.

टीप
ह्यात १/२ चमचा कच्ची कैरी किसून घालता येईल आणि जर घालत असल्यास लिंबाचा रस थोडा कमी वापरणे.
थोडा चाट मसाला पण घालता येईल
रवा-मैद्याचे पीठ भिजवल्यावर मिश्रण मिक्सरमध्ये फिरवता येईल त्यामुळे व गरम दह्यामुळे पुऱ्या एकदम कुरकुरीत बनतील

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP