टोमाटो थंडाई
अजून एक उन्हाळ्यासाठी उत्तम पेय्य. हे मी एका मासिकात वाचलेले आणि माझ्या चवीप्रमाणे थोडा बदल करून बनवले.
साहित्य
१/२ वाटी कंडेन्स्ड दुध
३ वाटी दुध
२ टोमाटो
२ चमचे खसखस
१/२ चमचा बडीशेप
१/२ चमचा साखर
१५ बदाम
कृती
- टोमाटो मिक्सरमध्ये वाटणे व गाळून फ्रीजमध्ये ठेवणे.
- २ चमचे पाण्यात खसखस भिजवून अर्धा तास ठेवणे.
- खसखस, बडीशेप आणि १/२ वाटी दुध एकत्र वाटणे व फ्रीजमध्ये ठेवणे.
- उरलेले दुध, कंडेन्स्ड दुध आणि साखर एकत्र बारीक वाटणे व फ्रीजमध्ये ठेवणे.
- प्यायला देताना टोमाटो, खसखस-बडीशेप मिश्रण आणि दुध एकत्र करून ढवळणे व बारीक केलेल्या बर्फावर ओतून देणे.
टीप
मी कंडेन्स्ड दुध वापरल्यामुळे अर्धा चमचा साखर वापरली पण जर दुध गोड नसेल तर त्यात अजून साखर वापरणे.
0 comments:
Post a Comment