मसालेदार बिर्यानी
मागच्यावेळी केलेली बियाणी आमच्या कडे काम करणाऱ्या बाईंच्या सांगण्याप्रमाणे केलेली. पण आज मी एका पुस्तकात वाचून हि केलेली बिर्यानी अजूनही सुंदर आणि चविष्ठ आहे.
साहित्य
४ चिकनचे लेग
२ वाटी तांदूळ
१ वाटी दही
४ कांदे
२ टोमाटो
१/४ वाटी दुध
१ बटाटा
मुठभर काजू
५-६ बदाम
२ चमचे तेल
१ चमचा पुदिना पाने
१ चमचा सुके खोबरे
२ वेलची
२ लवंग
३ दालचिनी
१ चमचा जीरा
१ चमचा धने
१ चमचा तिखट
१/४ चमचा मिरे पूड
१/२ चमचा खसखस
१/४ चमचा बडीशेप
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा आले
१ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
चिमुटभर केशर
मीठ
कृती
- एका भांड्यात दही, हळद, गरम मसाला, १/२ चमचा लसूण पेस्ट, १/४ चमचा आले पेस्ट आणि मीठ एकत्र करणे.
- चिकनचे तुकडे त्यात घालुन चांगले एकत्र करणे. फ्रीजमध्ये कमीत कमी ८ तास ठेवून देणे.
- तांदूळ कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घेणे.
- ३-४ चमचे पाण्यात खसखस भिजवणे.
- कोमट दुधात केशर घालुन बाजूला ठेवणे.
- बटाटे उकडून थंड करून त्याच्या साली काढून चकत्या करणे व बाजूला ठेवणे.
- २ कांदे पातळ उभे चिरून तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळणे.
- त्याच तेलात ५-६ काजू बाजूला ठेवून बाकीचे तळून घेणे.
- उरलेले कांदे बारीक कापून तेलात गुलाबी रंगावर भाजणे व बाजूला ठेवणे.
- त्याच तेलात २ दालचिनी, धने, जिरे, सुके खोबरे, बडीशेप, काजू आणि बदाम घालुन तळणे.
- त्यात तिखट, मिरे पूड, खसखस, पुदिना पाने आणि आधी भाजलेला बारीक कांदा घालणे व भाजणे. मिश्रण थंड करणे.
- मिश्रण मिक्सरमध्ये अर्धा टोमाटो सहित वाटणे.
- २ चमचा तूप बाजूला ठेवून उरलेले गरम करणे व त्यात हा वाटलेला मसाला खमंग भाजून घेणे.
- त्यात उरलेली आले पेस्ट, लसूण पेस्ट, बारीक चिरलेले टोमाटो आणि मीठ घालुन भाजणे.
- त्यात चिकन त्याच्या मासाल्यासाहित घालुन पूर्ण सुकेपर्यंत भाजणे.
- ग्रेव्हीतून बरेच तूप बाजूला सुटेल ते गाळून वेगळे करणे.
- चिकन शिजत असताना ७ वाटी पाणी उकळून त्यात तांदूळ घालुन त्यावर झाकणी ठेवून अर्धवट शिजवून घेणे. उरलेले पाणी गाळून टाकणे व थंड पाण्याखाली भात धुवून घेणे व बाजूला ठेवणे.
- १/२ चमचा तूप गरम करून त्यात उरलेले दालचिनी, लवंग, वेलची घालुन तळणे व भातावर सोडणे. त्यात मीठ घालुन चांगले एकत्र करणे.
- कुकरला तुपाचा हात लावून बटाट्याच्या चाकात्यांचा थर लावणे.
- भाताचा १/३ भाग बटाट्यावर पसरवणे. त्यावर तळलेले १/३ काजूचा वाटा, तळलेल्या कांद्याचा १/३ वाटा आणि अर्धे चिकन पसरणे.
- पुन्हा १/३ भाताचा वाटा, १/३ भाग काजू, १/३ भाग कांदा आणि उरलेले चिकन पसरवणे
- वरून उरलेला भात पसरवणे व त्यावर उरलेले काजू आणि कांदा पसरवणे.
- परतणीच्या मागच्या बाजूनी पूर्ण थरातून जाईल अशी ५-६ भोके पाडणे.
- चिकनमधून वेगळे केलेले तूप, केशर दुध वरून ओतणे.
- मंद आचेवर तवा ठेवून त्यावर हा कुकर बंद करून ठेवणे व १५ मिनिट शिजवणे व नंतर गरम गरम रायत्यासोबत खायला देणे.
टीप
थोडी मोठी कृती आहे पण इतकी चविष्ठ बिर्यानी बनते की कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल
बटाटे कुकर मध्ये खाली लावल्यानी भात खालून करपणार नाही.
सगळे पदार्थ आधीच शिजवून मग त्याचे थर लावल्यानी चिकन किंवा भात अर्धवट कच्चे राहण्याची चूक होऊ शकत नाही.
0 comments:
Post a Comment