दडपे पोहे
जेंव्हा मला पटकन होणारा पण चविष्ठ पदार्थ नाश्त्यासाठी बनवण्याची इच्छा होते तेंव्हा हा पदार्थ मनात येतो
साहित्य
३.५ वाटी पातळ पोहे
१ कांदा
२ टोमाटो
१ चमचा साखर
१.५ लिंबू
१/२ वाटी शेंगदाणे
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जिरे
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा हळद
१ चमचा तेल
मीठ
कृती
- पातळ पोह्यात टोमाटो आणि कांदा बारीक चिरून घालणे.
- त्यात साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालुन चांगले एकत्र करणे.
- कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घेणे व ते पोह्यात घालणे.
- त्याच तेलात म्हवरी, जीरा, मिरच्यांचे तुकडे घालुन फोडणी करणे व त्यात हळद घालणे.
- फोडणी पोह्यात घालुन ढवळणे व खायला देणे.
टीप
ह्यात पोह्यांना धुवायचे नसते कारण ते खूप पातळ असल्यानी लिंबाचा आणि टोमाटोचा रस त्यांना मऊ करण्यासाठी पुरेसा असतो.
आज करुन बघितले. आवडले. धन्यवाद !!!