केळे फ्राय
मला जेव्हा काहीतरी पटकन आणि चटपट बनवायचे असते तेंव्हा मी हि भाजी बनवते. वरण भाताबरोबर एकदम मस्त जाते हि भाजी
साहित्य
२ कच्ची केळी
१ चमचा जीरा
१ चमचा तिखट
१/४ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचे हळद
१/२ चमचा पिठी साखर
२ चमचा कोथिंबीर
मीठ
तेल/तूप
कृती
- केळ्यांची साले काढून त्यांचे चौकोनी तुकडे करणे.
- कढईत तेल/तूप गरम करून त्यात जिरे घालुन फोडणी करणे.
- त्यात केळ्यांचे तुकडे, तिखट, जिरे पूड, धने पूड, हळद आणि पिठी साखर घालुन केळी शिजेपर्यंत परतत भाजणे.
- वरून मीठ आणि कोथिंबीर घालुन वाढणे.
टीप
ह्यात थोडी आमचूर पूड घालुन थोडी आंबट चव देता येईल
कढई गॅसवरून उतरवताना भाजीत चमचाभर तूप सोडणे म्हणजे भाजी सुकी लागत नाही.
0 comments:
Post a Comment