केळ्याचे पेन केक
आज ३ पिकलेले केळे बघून मला ह्या कृतीची आठवण झाली. थोड्या दिवसांपूर्वी मी एक लेख वाचलेला आणि तेंव्हापासून मला हे कसे लागेल अशी उत्सुकता होती. एकदम चविष्ठ आणि नेहमीच्या नाश्त्यापेक्षा एकदम वेगळा.
साहित्य
३ केळे
२ अंडी
१ वाटी मैदा
१ वाटी दुध
१ चमचा बेकिंग पूड
२ चमचा साखर
४ चमचा मध
२ चमचा तेल
मीठ
तूप
कृती
- मैदा, बेकिंग पूड आणि मीठ एकत्र चाळणे
- अंडी, साखर आणि तेल एकत्र फेटणे.
- त्यात थोडे थोडे मैद्याचे मिश्रण आणि दुध घालत एकत्र करणे
- २ केळी कुस्करून त्या पिठात एकत्र करणे.
- तवा गरम करून त्याला तूप लावणे व त्यावर मंद आचेवर जाड डोसे बनवणे व दोन्ही बाजूनी गुलाबी रंगावर भाजणे.
- मध आणि केळ्याचे तुकडे वरून घालुन खायला देणे.
टीप
अंड्यामुळे केक एकदम छान फुगतात व तव्याला चिकटत नाही
नेहमीच्या भारतीय नाश्त्यापेक्षा वेगळा नाश्ता.
0 comments:
Post a Comment