भोपळ्याची पुरी
थोड्या दिवसांपूर्वी आई इथे आली असताना तिनी अश्या पुऱ्या बनवलेल्या आणि मला त्या फार आवडलेल्या. आज मी स्वतः बनवल्या आणि इथे कृती देत आहे
साहित्य
२ वाटी भोपळा
३/४ वाटी गुळ
३ वाटी गव्हाचे पीठ
मीठ
तेल
कृती
- भोपळ्याचे साल काढून किसून घेणे.
- २ चमचे तेल गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घालुन मध्यम आचेवर ५ मिनिट शिजवणे.
- आचेवरून बाजूला करून त्यात किसलेले गुळ घालुन एकत्र करणे.
- मिश्रण थंड झाले की त्यात मीठ, गव्हाचे पीठ घालुन घट्ट पीठ मळणे.
- पुऱ्या लाटून तळणे.
टीप
ह्या पुऱ्या थोडे दिवस ठेवता येतात त्यामुळे प्रवासात खायला चांगला पदार्थ आहे.
0 comments:
Post a Comment