लस्सी
पुण्यात असताना अप्पा बळवंत चौकावरच्या डेरीची लस्सी फार आवडायची. हि एकदम त्यासारखी बनते
साहित्य
१/२ लिटर दुध
२ चमचा दुध पूड
१ चमचा कॉर्न फ्लौर
१ चमचा दही
३ चमचा साखर
४-५ बर्फ
कृती
- अर्धा वाटी दुधात दुध पूड आणि कॉर्न फ्लौर एकत्र करणे.
- उरलेले दुध सारखे ढवळत उकळवणे.
- त्यात दुध-कॉर्न फ्लौर-दुधाची पूड मिश्रण घालणे व अजून ४-५ मिनिट उकळवणे.
- मिश्रण कोमट होईपर्यंत थंड करणे व दह्यात एकत्र करून दही बनवण्यासाठी ठेवणे.
- दही तयार झाले की त्यात बर्फ, साखर घालुन ४-५ मिनिट मिक्सरमध्ये वाटणे व थंड करून प्यायला देणे.
टीप
दुध उकळवताना सारखे ढवळणे आवश्यक आहे व साय तयार होऊ देऊ नये.
मी जाड दुध वापरून दही लावले त्यामुळे दही एकदम घट्ट लागले.
0 comments:
Post a Comment