मसाला पराठे
मी हे एकदम सोपे मसाला पराठे आज रात्रीच्या जेवणात बनवलेले. ह्याची कृती एकदम छोटी आणि सोपी आहे व पराठे एकदम उत्तम लागतात
साहित्य
२.५ वाटी गव्हाचे पीठ
१ चमचा मैदा
१/२ चमचा जिरे
१ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
मीठ
तेल
कृती
- परातीत मैदा, गव्हाचे पीठ, जिरे, जिरे पूड, धने पूड, तिखट, हळद आणि मीठ एकत्र करणे.
- त्यात २ चमचे तेल घालुन चांगले एकजीव करणे.
- पिठात पाणी घालुन मळून घेणे. एक चमचा तेल सोडून पुन्हा मळणे व पीठ कमीत कमी अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देणे.
- लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून त्रिकोणी घडी घालुन लाटणे. तव्यावर तेल सोडून भाजून घेणे.
टीप
हळद घातल्यानी पराठे एकदम मस्त पिवळे होतात. मी जरा कमीच तेलावर पराठे भाजले त्यामुळे त्यांचा पिवळा रंग शाबूत राहिला.
मैदा घातल्यानी पराठे मस्त खुसखुशीत होतात.
0 comments:
Post a Comment