ब्रेड सॅन्डविच फ्राय
ह्या सारखाच अजून एक पदार्थ: ब्रेड रोल बनवलेला पण ह्यात थोडे वेगळे मिश्रण घातल्यानी इथे देत आहे.
साहित्य
८ ब्रेड स्लाईस
१ बटाटे
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा आमचूर पूड
मीठ
तेल
कृती
- बटाटे किसून पाण्यात घालणे
- पाणी निथळून त्यात तिखट, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घालणे.
- ब्रेडच्या कडा कापून टाकणे.
- प्रत्येक ब्रेडचा तुकडा एक-दोन सेकंद पाण्यात भिजवणे व लगेच ओं तळव्यांमध्ये दाबून पाणी काढणे.
- मध्ये बटाट्याचे मिश्रण घालुन कडा दुमडून त्रिकोणी आकारात बंद करणे.
- कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर ब्रेड तळणे.
टीप
ब्रेड खूप जास्तवेळ पाण्यात बुडवला तर त्याचा लगदा होईल व नीट आकार देता नाही येणार त्यामुळे पटकन पाण्यातून बाहेर काढणे महत्वाचे आहे
0 comments:
Post a Comment