पनीर सॅन्डविच
आज मला थोड्या वेगळ्या लोकांवर प्रयोग करायची संधी मिळाली. वेगळे लोक म्हणजे आई बाबा आणि वेगळी जागा म्हणजे पुण्याचे त्यांचे घर. मी इथे थोडे दिवस राहण्यासाठी आलीये आणि सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळे आणि लवकर होणारा पदार्थ म्हणून मी हे सॅन्डविच बनवले.
साहित्य
१२ ब्रेड स्लाईसेस
२ वाटी किसलेले पनीर
४ हिरव्या मिरच्या
मुठभर कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/२ चमचा जीरा पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा आमचूर पूड
मीठ
लोणी
कृती
- पनीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ एकत्र करणे.
- ब्रेडच्या एका स्लाईसला एका बाजूनी लोणी लावणे व ती बाजू खाली ठेवून ताटलीत ठेवणे.
- ब्रेड वर पनीरचे मिश्रण पसरवून त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवणे. त्याच्या वरच्या बाजूलासुद्धा लोणी लावणे.
- सॅन्डविच भाजून गरम गरम वाढणे.
टीप
ब्रेडच्या तुकड्यांना आधीच लोणी लावून घेतले तर भाजायला ठेवताना मिश्रण बाहेर पडत नाही.
0 comments:
Post a Comment