पनीर पुदिना टिक्का
हा अजून एक सोप्पा आणि चावैस्था पदार्थ मी शुक्रवारच्या जेवणात बनवला.
साहित्य
२०० ग्राम पनीर
१/४ वाटी दही
१/२ वाटी पुदिना
१/४ वाटी कोथिंबीर
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा लसूण पेस्ट
४ हिरव्या मिरच्या
लोणी
मीठ
कृती
- पनीरचे चौकोनी तुकडे करणे.
- पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण आणि मिरच्या एकत्र मीठाबरोबर वाटणे.
- त्यात दही घालणे व ते पनीरच्या तुकड्यांना लावणे. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणे
- ओव्हन २५०C वर गरम करणे.
- बेकिंग ट्रेला लोणी लावणे व त्यावर पनीरचे तुकडे पसरणे.
- पनीर २००C वर ५ मिनिट भाजणे.
- पनीर उलटे करून अजून ५ मिनिट भाजणे.
टीप
पनीरचे तुकडे रात्रीच्या जेवणात एकदम छान लागत होते पण नाश्त्याला इतके नाही त्यामुळे जर जास्तीचे तुकडे असतील तर ते तसेच फ्रीजमध्ये ठेवून आयत्यावेळी भाजणे.
0 comments:
Post a Comment