पालक पनीर
हा अजून एका अजॉयला पालक खाऊ घालण्याचा पालक पुरीशिवाय अजून एक प्रयत्न.
साहित्य
२ पालक
२०० ग्राम पनीर
२ टोमाटो
५ चमचा क्रीम
१/४ चमचा कॉर्न फ्लौर
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा जिरे
१/४ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा कसुरी मेथी
मीठ
तेल
कृती
- ४-५ वाटी पाणी उकळवून त्यात पालकाची पाने दोन मिनिट बुडवणे.
- पाणी ओतून पाने बारीक वाटणे.
- तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
- त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, हळद व बारीक चिरलेला टोमाटो घालणे.
- थोडा वेळ परतून त्यात तिखट, धने पूड, जिरे पूड आणि कसुरी मेथी घालणे.
- मंद आचेवर टोमाटो शिजेपर्यंत परतणे.
- मिक्सरमध्ये पालकाच्या पेस्ट बरोबर घालुन बारीक वाटणे.
- कढईत पनीरच्या तुकड्यांबरोबर एकत्र उकळवणे.
- त्यात क्रीम घालणे.
- कॉर्न फ्लौर ४ चमचा पाण्याबरोबर एकत्र करून उकळत्या भाजीत घालुन वाढणे.
टीप
क्रीम आणि कॉर्न फ्लौरनी ग्रेव्ही जरा जाड होते. फक्त क्रीम वापरल्यानी ग्रेव्हीतून पालकाची चव जाऊ शकते आणि कॉर्न फ्लौरनी एकदम पाणचट होऊ शकते त्यामुळे मी दोन्ही एकत्र वापरले
0 comments:
Post a Comment