शेंगण्याचे चॉकोचीप मफीन
ह्या वेळी अजॉयनी युस वरून मफीनचे भांडे आंडले आहे. घरात पीनट बटर असल्यानी त्याचा वापर करण्याचे मी ठरवले आणि हे मफीन बनवले.
साहित्य
१ वाटी पीनट बटर
१ वाटी चॉकोचीप
२ वाटी मैदा
१ चमचा व्हॅनिला इसेन्स
१.५ वाटी साखर
२ अंडी
१.५ चमचा बेकिंग पूड
१/२ चमचा खाण्याचा सोडा
१/२ वाटी दुध
कृती
- पीनट बटर, अंडी, साखर आणि व्हॅनिला इसेन्स एका भांड्यात एकत्र फेटणे.
- मैदा, बेकिंग पूड, खाण्याचा सोडा एकत्र ३-४ वेळा चाळून घेणे.
- एका वेळी थोडा थोडा मैदा लोण्यात घालुन फेटणे.
- त्यात चॉकोचिप्स घालुन हलकेच ढवळणे.
- ओव्हन २००C वर गरम करणे.
- मफीनच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात प्रत्येक भांड्यात २/३ काटापर्यंत मिश्रण घालणे.
- ओव्हनमध्ये २००C वर १५ मिनिट मफीन भाजणे.
टीप
इथे चॉकोचिप्स मिळत नसल्यानी मी कॅडबरीचे तुकडे करून वापरले.
तसेच मला असे लक्षात आले की मी जर अर्धे साधे लोणी आणि अर्धे पीनट बटर वापरले असते तर जास्त चांगली चव आली असती.
0 comments:
Post a Comment