कटाची आमटी
हि आमटी पुरण पोळीच्या डाळीच्या उरलेल्या पाण्यातून बनवतात. एकदम गोड आणि आंबट अशी हि आमटी पुरण पोळी बरोबर एकदम मस्त लागते.
साहित्य
२ वाटी हरबरा डाळ शिजवलेले पाणी
१/२ वाटी पुरण
१/२ वाटी गुळ
२ चमचा चिंच
१ चमचा धने
१ चमचा जिरे
१/२ चमचा म्हवरी
१ चमचा तिखट
४ चमचा खोबरे
१५ कडीपत्याची पाने
मीठ
तेल
कृती
- चिंच एक वाटी पाण्यात भिजवणे व बाजूला ठेवणे.
- चमचाभर तेल गरम करून त्यात धने आणि जिरे फोडणी करणे.
- किसलेले खोबरे घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
- मिक्सरमध्ये खोबऱ्याचे मिश्रण घालुन चिंचेबरोबर बारीक वाटणे.
- अर्धा चमचा तेल गरम करून त्यात म्हवरी घालुन फोडणी करणे.
- कडीपत्ता घालुन भाजणे
- त्यात चिंच खोबऱ्याचे वाटण घालणे व एक मिनिट भाजणे.
- तिखट घालुन अजून एक मिनिट भाजणे.
- डाळीचे पाणी, पुरण आणि गुळ घालणे. जाड वाटल्यास थोडे पाणी पण घालणे.
- मीठ घालुन आमटी उकळवणे.
टीप
डाळीचे पाणी नसेल तर साधे पाणी पण वापरता येईल
पुरण बनवण्यासाठी ह्या पुरण पोळीच्या कृतीचा उपयोग करणे
0 comments:
Post a Comment