चेरी आणि काजूचा कप केक
मफीन बनवल्यापासून मी बरेच दिवस कप केक बनवण्याचा विचार करत होते. आज शेवटी मुहूर्त लागला :) :)
साहित्य
२ वाटी टीन मधली चेरी
१ वाटी चेरीचे सिरप
१ वाटी पिठी साखर
२ अंडी
१/२ वाटी लोणी
२ वाटी मैदा
२.२५ चमचा बेकिंग पूड
१/२ वाटी दुध
१/२ वाटी काजू
कृती
- लोणी, पीठ साखर आणि अंडी एकत्र फेटणे.
- मैदा आणि बेकिंग पूड एकत्र चाळून घेणे
- एकावेळी थोडा थोडा मैदा लोण्यात घालत एकत्र करणे.
- चेरीच्या बिया काढून त्या, त्यांचे सिरप, काजू आणि दुध पिठात घालुन हलके एकत्र करणे.
- ओव्हन २००C वर गरम करणे.
- कप केपच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात २/३ काटापर्यंत मिश्रण भरणे
- ओव्हनमध्ये २००C वर २० मिनिट केक भाजणे.
टीप
चेरी सिरप आणि थोडेसे वाटले गेलेले चेरी एकत्र मिळून एकदम चांगली चव देतात.
ह्यात बदाम आणि अक्रोडपण वापरता येतील पण माझ्याकडे ते नसल्यामुळे मी नाही वापरले
मी खारट मीठ वापराल्यानी वेगळे मीठ मैद्यात घातले नाही पण जर मीथाविना लोणी वापरले तर मैद्यात मीठ घालायला विसरू नये.
0 comments:
Post a Comment