Showing posts with label पेय्य. Show all posts
Showing posts with label पेय्य. Show all posts

कलिंगड स्प्लॅश


आजच्या जेवणानंतर मला कलिंगडाच काहीतरी नवीन बनवण्याचं मन केल आणि त्यातूनच ही ज्यूसची पाककृती आली.

कलिंगड स्प्लॅश
साहित्य
१/२ कलिंगड
२ मोठे लिंबू
४ चमचे साखर
६-७ पुदिना पानं
१/४ चमचे चाट मसाला
१/४ चमचे जिरे पूड
चिमुटभर मिरे पूड
मीठ चवीनुसार

कृती
  • कलिंगड चिरून मिक्सरच्या भांड्यात घालणे
  • त्यात लिंबू रस, साखर, पुदिना पानं, मीठ, जीरा पूड, चाट मसाला घालणे
  • मिक्सरमध्ये ज्यूस चांगला वाटून घेणे
  • ज्यूस ग्लासमध्ये ओतून त्यावर मिरे पूड शिंपडणे. ज्यूस थंड होण्यासाठी ठेवून देणे.
  • वरून पुदिना पानं आणि कलिंगडाचे गोळे घालुन प्यायला देणे.

टीप
ज्यूस लवकर थंड होण्यासाठी मी १० मिनिट त्याला फ्रीजरमध्ये ठेवून दिला. त्याऎवजी थंड कलिंगड वापरल तर १० मिनिटपण वाट बघावी लागणार नाही :)
मी बीनबियांचे कलिंगड वापले त्यामुळे मला बिया वेगळे काढण्याचे कष्ट घ्यावे नाही लागले.

कोकम सरबत


एक मस्तपणे ताजेतवाने करणारे पेय्य. मी हे बरेचवेळा बनवते पण आज फोटो काढून पाककृती देत आहे.

कोकम सरबत
साहित्य
१०-१२ कोकम
३ चमचे साखर
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
मीठ चवीपुरते

कृती
  • कोकम १/२ वाटी पाण्यात एक तासभर भिजवून ठेवणे.
  • कोकम व पाणी मिक्सर मध्ये घालणे. त्यात ३.५ वाटी पाणी, साखर, जिरे पूड, धने पूड आणि मीठ घालणे.
  • मिक्सरमध्ये एकदम बारीक होईपर्यंत वाटणे.
  • सरबत गाळून घेऊन थंडगार प्यायला देणे.

टीप
जर सरबत बर्फ घालुन द्यायचे असेल तर १/२ वाटी कमी पाणी घालणे म्हणजे सरबताची चव कमी होणार नाही.

गुलाब आणि सुकामेव्याचा मिल्कशेक


मी पुण्याहून ह्यावेळी थोडा गुलकंद घेवून आलेले. आज फार जास्त गरम नव्हता पण फ्रीजमध्ये आईस्क्रीम आणि बाहेर शेल्फवर गुलकंद बघून मी हा मिल्कशेक बनवण्याचे ठरवले. एकदम सुंदर आणि शांत शुक्रवारची संध्याकाळ.

गुलाब आणि सुकामेव्याचा मिल्कशेक
साहित्य
६ वाटी दुध
२ वाटी व्हॅनिला आईसक्रीम
१/३ वाटी काजू
१/३ वाटी बदाम
१/३ वाटी पिस्ता
१/२ वाटी साखर
२ चमचे गुलकंद
चिमुटभर लाल रंग

कृती
  • मिक्सरमध्ये काजू, बदाम, पिस्ता घालुन बारीक पूड करून घेणे.
  • त्यात गुलकंद, आईस्क्रीम घालुन पुन्हा वाटणे.
  • त्यात दुध, साखर आणि लाल रंग घालुन शेक होईपर्यंत वाटणे.

टीप
मी थोडा सुकामेवा अर्धवट वाटून वापरला त्यामुळे त्यांचे तुकडे शेक पिताना मध्ये मध्ये येत होते आणि त्याची चव अजून जास्त चांगली लागली
थोड सजवण्यासाठी मी लाल रंग १-२ थेंब पाण्यात घालुन चमच्याची मागची बाजू त्यात बुडवून शेकवरती डिझाईन बनवली.

कोल्ड कॉफी


सगळ्यात पहिल्यांदा मी इंस्टंट पूड वापरून कोल्ड कॉफी बनवायला चालू केलेला. माझ्या बहिणीला टी खूप आवडायची त्यामुळे कधीही कोल्ड कॉफी म्हटले की मला तिचीच आठवण येते. कोल्ड कॉफी आणि बहिण असे एक समीकरणच झालेय. आवडीबरोबरच बरेच काही प्रसंग आणि आठवणीपण आहेत. इथे आल्यापासून कॉस्कोचे डीलचे कुपन वापरून आम्ही भरपूर बाटल्या ह्या स्टारबक्स बनवते त्या पिल्या. पण थोडे दिवसांनी मला फ्रेश थंड कॉफीची फारच कमी वाटायला लागली आणि मी हि घरीच बनवायला चालू केली. मला भारतात सीमासाठी हि बनवण्याची फार इच्छा होती पण सर्दी खोकला यामुळे नाही करता आली. इथे मी पाककृती देतीये आणि अशी आशा करते की ती हि बनवेल आणि आमचे सोनेरी दिवस जेंव्हा आम्ही वेड्यासारखे कॉफीच्या मागे होतो ते आठवेल

कोल्ड कॉफी
साहित्य
४ वाटी दुध
२ वाटी व्हॅनिला आईसक्रीम
१.५ चमचा कॉफी पूड
५ चमचे साखर

कृती
  • एक वाटीभर पाणी उकळवून त्यात साखर विरघळवणे
  • त्यात कॉफी घालुन विरघळवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • मिक्सरमध्ये आईस्क्रीम, कॉफी आणि दुध घालुन फिरवणे.
  • चांगले फेस येई पर्यंत फिरवणे आणि थंड खायला देणे.

टीप
आईस्क्रीम वापरल्यानी कॉफी लगेच प्यायला देता येते व नंतर थंड करावी लागत नाही.

खरबूजाची लस्सी


२ आठवड्यांपूर्वी मी एकदम वेगळा प्रयोग करून पहिला. फ्रीजमध्ये एक जुने खरबूज होते आणि दही होते त्यातून निर्माण झालेली हि कृती

खरबूजाची लस्सी
साहित्य
१ खरबूज
६ वाटी दही
५ चमचे साखर
एक थेंब व्हॅनिला इसेन्स
मीठ

कृती
  • खरबूज बारीक कापून घेणे
  • थोडे तुकडे वरून वापरण्यासाठी बाजूला ठेवणे व बाकीचे मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  • ज्यूस गाळून घेणे आणि दह्यात मिसळणे.
  • त्यात साखर, मीठ, व्हॅनिला इसेन्स घालुन पुन्हा चांगले ढवळणे.
  • प्यायला देताना ग्लासमध्ये वरून खरबुजाचे तुकडे घालुन थंड करून देणे.

टीप
मी एकदम घट्ट दही वापरलेले आणि पाण्याचा बिलकुल वापर नाही केला कारण खाराबुजाचेच पाणी वापरल्यानी चव चांगली आली.

पियुष


अगदी लहान असल्यापासून बाबा मला एफ सी रोडवरच्या बँकपासून लक्ष्मी रोडपर्यंत चालत घेऊन जायचे. मला ते चालणे फार आवडायचे ते एकमेव कारणाकरता. सगळ्यात शेवटी जनता दुग्ध मंदिरात पियुष प्यायला मिळायचा. जेंव्हा जेव्हा मी पुण्याला जाते तेंव्हा न चुकता खूप सारा पियुष पिऊन येते. २-३ वर्षांपूर्वी आईनी तो घरी बनवायला चालू केला. काल मी स्वतः करून बघितला आणि प्रयोग एकदम यशस्वी होता.

पियुष
साहित्य
५ वाटी दही
१ लिंबू
८ चमचा साखर
चिमुटभर जायफळ पूड
चिमुटभर पिवळा रंग
मीठ

कृती
  • दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करणे.
  • त्यात साधारण २-३ वाटी पाणी घालुन पातळ करणे.
  • मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.

टीप
मी एकदम जाड दुध वापरून दही बनवले व दह्याला आंबट होऊ दिले नाही. लिंबाची एकदम चांगली चव देते
बऱ्याचवेळा लिंबाच्या कडव्यामुळे हे कडू होते म्हणून आज मी १/२ चमचा व्हिनेगर वापरले आणि त्याचा एकदम खूप चांगला उपयोग झाला. कडूपणा नाही आणि चव पण एकदम बरोबर

खोबऱ्याची लस्सी


मी जेंव्हा हि कृती वाचलेली तेंव्हा मला बिलकुल वाटले नव्हते की ती इतकी सुंदर होईल.

खोबऱ्याची लस्सी
साहित्य
१/२ खोबरे
१ वाटी चक्का
८ चमचे साखर
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर केशर
मीठ

कृती
  • खोबरे किसून त्यात पाणी घालुन मिक्सरमध्ये वाटून खोबऱ्याचे दुध काढणे.
  • चक्का, केशर, वेलची पूड, साखर आणि मीठ मिक्सरमध्ये एकत्र वाटणे.
  • त्यात खोबऱ्याचे दुध घालुन पुन्हा वाटणे
  • मिश्रणात बर्फ घालुन पुन्हा थोडे वाटणे
  • प्यायला देताना त्यात केशर घालुन देणे.

टीप
चक्का दुकानातून खरेदी करता येईल किंवा घरी बनवता येईल. मी जेंव्हा श्रीखंड बनवले तेंव्हा त्यातील एक वाटी चक्क बाजूला ठेवून हि लस्सी बनवली. चक्का बनवण्याची कृती श्रीखंडआम्रखंड ह्या दोन्हींच्या कृतीत दिलेली आहे.
मी नेहमी घरी बनवलेले नारळाचे दुध वापरते जे एकदम जाड नसते त्यामुळे मी बर्फ न वापरता लस्सी बनवून मग थंड केली. जर विकतचे खोबऱ्याचे दुध वापरायचे असेल तर त्यात बर्फ किंवा पाणी वापरणे महत्वाचे आहे. १ वाटी चक्क्यात १ वाटी पाणी किंवा बर्फ आणि ३ वाटी नारळाचे दुध बरोबर होईल

हिरवी पाचक लस्सी


थोड्या दिवसांपूर्वी मी पेपरमध्ये एक लेख वाचला तेंव्हा मला ह्या कृतीची आयडिया आली.

हिरवी पाचक लस्सी
साहित्य
१.५ वाटी दही
१/२ वाटी पुदिना
१ वाटी कोथिंबीर
१ काकडी
१/४ वाटी कोबी
चिमुटभर काळे मीठ
२ चमचा साखर

कृती
  • काकडी आणि कोबी एकत्र किसणे.
  • दही, पुदिना, कोथिंबीर, काकडी, कोबी, काळे मीठ, साखर आणि ५-६ बर्फ एकत्र ५ मिनिट मिक्सरमध्ये वाटणे.
  • थंड करून प्यायला देणे.

टीप
मी जाड दुध वापरून दही बनवले पण जर साध्या दुधाचे दही वापरले तर बर्फ थोडा कमी घालणे.

लस्सी


पुण्यात असताना अप्पा बळवंत चौकावरच्या डेरीची लस्सी फार आवडायची. हि एकदम त्यासारखी बनते

लस्सी
साहित्य
१/२ लिटर दुध
२ चमचा दुध पूड
१ चमचा कॉर्न फ्लौर
१ चमचा दही
३ चमचा साखर
४-५ बर्फ

कृती
  • अर्धा वाटी दुधात दुध पूड आणि कॉर्न फ्लौर एकत्र करणे.
  • उरलेले दुध सारखे ढवळत उकळवणे.
  • त्यात दुध-कॉर्न फ्लौर-दुधाची पूड मिश्रण घालणे व अजून ४-५ मिनिट उकळवणे.
  • मिश्रण कोमट होईपर्यंत थंड करणे व दह्यात एकत्र करून दही बनवण्यासाठी ठेवणे.
  • दही तयार झाले की त्यात बर्फ, साखर घालुन ४-५ मिनिट मिक्सरमध्ये वाटणे व थंड करून प्यायला देणे.

टीप
दुध उकळवताना सारखे ढवळणे आवश्यक आहे व साय तयार होऊ देऊ नये.
मी जाड दुध वापरून दही लावले त्यामुळे दही एकदम घट्ट लागले.

टोमाटो थंडाई


अजून एक उन्हाळ्यासाठी उत्तम पेय्य. हे मी एका मासिकात वाचलेले आणि माझ्या चवीप्रमाणे थोडा बदल करून बनवले.

टोमाटो थंडाई
साहित्य
१/२ वाटी कंडेन्स्ड दुध
३ वाटी दुध
२ टोमाटो
२ चमचे खसखस
१/२ चमचा बडीशेप
१/२ चमचा साखर
१५ बदाम

कृती
  • टोमाटो मिक्सरमध्ये वाटणे व गाळून फ्रीजमध्ये ठेवणे.
  • २ चमचे पाण्यात खसखस भिजवून अर्धा तास ठेवणे.
  • खसखस, बडीशेप आणि १/२ वाटी दुध एकत्र वाटणे व फ्रीजमध्ये ठेवणे.
  • उरलेले दुध, कंडेन्स्ड दुध आणि साखर एकत्र बारीक वाटणे व फ्रीजमध्ये ठेवणे.
  • प्यायला देताना टोमाटो, खसखस-बडीशेप मिश्रण आणि दुध एकत्र करून ढवळणे व बारीक केलेल्या बर्फावर ओतून देणे.

टीप
मी कंडेन्स्ड दुध वापरल्यामुळे अर्धा चमचा साखर वापरली पण जर दुध गोड नसेल तर त्यात अजून साखर वापरणे.

कलिंगडाची लस्सी


उन्हाळ्याची गरमी वाढल्यापासून मी फळाचा ज्यूस आणि बाकीचे थंडगार पेय्ये बनवतीये. हे त्यातील एक.

कलिंगडाची लस्सी
साहित्य
३ वाटी कलिंगड
१.५ वाटी दही
३ चमचा साखर
२ चिमुट मिरे पूड
मीठ

कृती
  • कलिंगडाच्या बिया काढून टाकणे.
  • कलिंगड, दही, साखर, मिरे पूड आणि मीठ एकत्र वाटणे.
  • मिश्रण घट्ट असेल तर त्यात थोडा बर्फ घालुन अजून थोडे वाटणे. थंडगार प्यायला देणे.

टीप
मी जाड दुधाचे गोड दही वापरले.

पन्ह


हे एकदम ताजे तवाने करणारे पैय्या मी ह्या वर्षीच्या पहिल्या कैरींचे बनवले.

पन्ह
साहित्य
३ कैऱ्या
२.५ वाटी गुळ
मीठ

कृती
  • कैरीची साल काढून त्याचे तुकडे करणे.
  • कुकरमध्ये पाणी घालुन उकडणे.
  • कैरी थंड झाली की मिक्सरमध्ये वाटून मिश्रण गाळून घेणे.
  • त्यात गुळ आणि मीठ घालुन विरघळेपर्यंत ढवळणे.
  • अजून थोडे थंड पाणी घालुन पातळ पन्ह बनवणे.

टीप
गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणाप्रमाणे बदलावे लागते

डाळिंब रिफ्रेशर


खूप दिवसांपासून आम्ही भरपूर डाळिंब आणतोय. सध्या सारखी सर्दी होत असल्यानी आंबट फळे खाऊ नाही शकत आहे. काल डाळींबाचा रस करायचा ठरवला पण त्यात थोडा आंबटपणा आणायचा होता की ज्याने करून आम्हाला थोडे व्हिटॅमिन सी मिळेल आणि थोडी चटपट चव पण येईल आणि त्यातूनच हे रिफ्रेशर तयार झाले

डाळिंब रिफ्रेशर
साहित्य
२ डाळिंब
२ लिंबू
१/२ हिरवी मिरची
३ चमचा साखर
१.५ ग्लास पाणी
चिमुटभर आले पेस्ट

कृती
  • डाळींबाची साल काढून त्यातील दाणे बाजूला काढणे.
  • मिक्सरमध्ये डाळिंबाचे दाणे, साखर, आले पेस्ट हिरवी मिरची घालून बारीक वाटणे.
  • त्यात पाणी आणि लिंबाचा रस घालुन पुन्हा वाटणे.
  • गाळून थंडगार प्यायला देणे.

टीप
हे बर्फाबरोबरपण देता येईल पण आम्हाला सर्दी असल्यानी आम्ही साधे पाणी वापरून विनाबर्फ प्यायले आणि तरी सुद्धा छान लागले

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP