कोकम सरबत
एक मस्तपणे ताजेतवाने करणारे पेय्य. मी हे बरेचवेळा बनवते पण आज फोटो काढून पाककृती देत आहे.
साहित्य
१०-१२ कोकम
३ चमचे साखर
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
मीठ चवीपुरते
कृती
- कोकम १/२ वाटी पाण्यात एक तासभर भिजवून ठेवणे.
- कोकम व पाणी मिक्सर मध्ये घालणे. त्यात ३.५ वाटी पाणी, साखर, जिरे पूड, धने पूड आणि मीठ घालणे.
- मिक्सरमध्ये एकदम बारीक होईपर्यंत वाटणे.
- सरबत गाळून घेऊन थंडगार प्यायला देणे.
टीप
जर सरबत बर्फ घालुन द्यायचे असेल तर १/२ वाटी कमी पाणी घालणे म्हणजे सरबताची चव कमी होणार नाही.
0 comments:
Post a Comment