मालपुआ
प्रत्येक आठवड्याला अजॉय डोक्यात तेल घालुन देण्यासाठी विचारतो. (तो माझ्या डोक्यात तेल घालुन देतो) माझा उत्तर ठरलेलं असत : मी कोणताही पदार्थ बनवून देऊ शकते पण तेल मालिश ते सुद्धा दर आठवड्याला तुझ्या इतक्या छोट्या केसांसाठी फार जास्त कष्ट दायक आहे. एखाद दुसऱ्या महिन्यातून एकदा मी करू शकते. मागच्या शनिवारी जेंव्हा मी हे उत्तर पुन्हा दिले तेंव्हा त्यांनी मालपुआची फर्माईश केली. मी पटकन थोडा फार पाकक्रिया शोधायला चालू केला पण प्रत्येकजण वेगवेगळ सांगत होते. शेवटी हि पाककृती मी स्वतःच बनवली.
साहित्य
१ वाटी मैदा
१/२ वाटी रवा
२.५ वाटी दुध
१ चमचा बडीशेप
१.५ वाटी साखर
चिमुटभर केशर
बदाम आणि पिस्ता वरून घालण्यासाठी
कृती
- मैदा, रवा, बडीशेप आणि दुध एकत्र मिसळून ४ तास भिजवत ठेवणे.
- साखर १.५ वाटी पाण्यात घालुन एकतारी पाक बनवणे.
- त्यात केशर घालुन बाजूला ठेवणे.
- कढई गरम करून त्यात १/४ वाटी आधी बनवलेले रवा-मैद्याचे पीठ गोलाकार ओतणे
- गुलाबी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून झाल्यावर त्याला साखरेच्या पाकात दोन मिनिट बुडवणे.
- पाकातून बाहेर काढून त्यावर बदाम पिस्ताचे तुकडे पसरवून खायला देणे.
टीप
बऱ्याच व्हिडीओ मध्ये मालपुआ फ्राय करायला सांगितलेला पण पुढच्यावेळी मी शॅलो फ्राय करणार आहे.
तसेच मी १ वाटी साखरेचा पाक बनवला असल्यानी शेवटच्या थोड्या मालपुआना पाक पुरला नाही
मी ह्याच्याआधी हैदराबादमध्ये बडी मा आल्या होत्या तेंव्हा फक्त एकदाच मालपुआ खाल्ले आहेत त्यामुळे त्याची चव नक्की कशी असते ह्याचा फार काही अंदाज मला नाहीये. त्यामुळे पुढच्या वेळी मी मांना विचारून किती फरक आहे ते बघणार आहे.
0 comments:
Post a Comment