पन्ह
हे एकदम ताजे तवाने करणारे पैय्या मी ह्या वर्षीच्या पहिल्या कैरींचे बनवले.
साहित्य
३ कैऱ्या
२.५ वाटी गुळ
मीठ
कृती
- कैरीची साल काढून त्याचे तुकडे करणे.
- कुकरमध्ये पाणी घालुन उकडणे.
- कैरी थंड झाली की मिक्सरमध्ये वाटून मिश्रण गाळून घेणे.
- त्यात गुळ आणि मीठ घालुन विरघळेपर्यंत ढवळणे.
- अजून थोडे थंड पाणी घालुन पातळ पन्ह बनवणे.
टीप
गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणाप्रमाणे बदलावे लागते
0 comments:
Post a Comment