फणसाची भाजी
ह्या वेळी बाजारात कच्चा फणस मिळाला त्यामुळे मी त्याची भाजी करून बघितली
साहित्य
१ कच्चा फणस
४ चमचे शेंगदाणा कुट
१/२ नारळ
२ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा गुळ
१ चमचा म्हवरी
मीठ
तेल
कृती
- फणसाची साल आणि आतील कडक जाड गर कापून टाकणे.
- उरलेले गरे बियांसकट बारीक चिरणे.
- कढईत तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे
- त्यात हळद, हिरव्या मिरच्या, चिरलेला फणस घालणे व ३-४ मिनिट परतणे.
- साधारण २ वाटी पाणी घालुन फणस झाकण लावून शिजवणे. लागल्यास अजून थोडे थोडे पाणी घालत राहणे
- भाजी शिजल्यावर त्यात गुळ, तिखट, मीठ, किसलेले खोबरे, शेंगदाणा कुट घालुन ढवळणे.
टीप
फणस कापताना हाताला आणि सुरीला तेल लावणे म्हणजे तो चिकटत नाही
0 comments:
Post a Comment