वाटली डाळ
उन्हाळा चालू झाला की कैरी जेवणात वापरणे चालू होते. असाच हा एक पदार्थ हळदी कुंकूमध्ये एकदम प्रसिद्ध
साहित्य
१ कैरी
१ वाटी हरबरा डाळ
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा साखर
१/४ चमचा हळद
१/४ चमचा म्हवरी
मीठ
तेल
कृती
- हरबरा डाळ ५-६ तास पाण्यात भिजवणे.
- डाळ पाण्यातून उपसून त्यात मिरची घालुन बारीक वाटणे.
- त्यात किसलेली कीर घालुन एकत्र करणे.
- मीठ आणि साखर घालुन एकत्र करणे.
- तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे.
- त्यात हळद घालुन फोडणी डाळीत घालुन एकत्र करणे.
टीप
फोडणीत सुकलेली लाल मिरची पण घालता येईल
0 comments:
Post a Comment