आलू पराठा
जेंव्हा मला पटकन काहीतरी बनवायचे असते तेंव्हा मला पराठे बनवायला आवडते. अजॉयला ते फार आवडतात आणि मग भाजी नाही बनवली तरी चालते. काल घरात कुठलीच भाजी नसल्यानी मी शेवटी आलू पराठे बनवले
साहित्य
२ बटाटे
७ चमचा भरून गव्हाचे पीठ
१/४ चमचा लसूण पेस्ट
३-४ हिरव्या मिरच्या
चिमुटभर जीरा पूड
१ चमचा आमचूर पूड
मीठ
तेल
तूप
कृती
- थोडेसे तेल गव्हाच्या पिठात घालुन पीठ मळणे व अर्धा तास भिजण्यासाठी ठेवणे
- बटाटे उकडून त्यांची साले काढून किसणे.
- मिक्सरमध्ये हिराव्या मिरच्या, लसूण पेस्ट एकत्र वाटणे.
- किसलेल्या बटाट्यात वाटण, आमचूर पूड, जीरा पूड, मीठ घालुन मळणे व त्याचे छोटे छोटे गोळे करणे.
- चपातीच्या पीठाचे गोळे करून दाबून वाटीचा आकार देणे. त्यात बटाट्याचा गोळा ठेवून चपातीचे पीठ बंद करणे.
- पराठे अलगद लाटून तव्यावर गुलाबी रंगावर तेल/तूप सोडून भाजणे.
टीप
बटाटे किसताना त्याला किसणीला तेल लावले तर बटाटा किसणीला चिकटत नाही
0 comments:
Post a Comment