मेथी मलई मटार
मला मेथी मलई मटार फार आवडते. बरेच दिवस मी माझ्या आवडीची चव आणण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी श्रीन्खलाला विचारले आणि तिच्याकडून हि पंजाबी कृती घेतली
साहित्य
२ मेथी
१ वाटी क्रीम
२ वाटी मटार
१/४ चमचा जिरे
चिमुटभर हिंग
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर दालचिनी पूड
चिमुटभर लवंग पूड
१ कांदा
१/२ चमचा खसखस
१.५ चमचा साखर
५-६ चमचे दही
१५-२० काजू
१ हिरवी मिरची
१/४ चमचा आले पेस्ट
मीठ
तूप
कृती
- ४-५ वाटी पाणी मीठ घालुन उकळवणे व त्यात मेथीची पाने ५ मिनिट भिजवून ठेवणे.
- पाण्यातून मेथी बाहेर काढून गाळणीवर चांगली दाबून पाणी वेगळे करणे. मिठी बाजूला ठेवणे.
- मटार उकडून बाजूला ठेवणे.
- कांदा, खसखस, साखर, दही, काजू, हिरवी मिरची, आले पेस्ट एकत्र वाटणे.
- क्रीम फेटून घेणे.
- कढईत तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे व हिंग घालणे.
- त्यात वाटलेले मिश्रण घालुन मंद आचेवर तूप सुटेपर्यंत परतणे.
- त्यात फेटलेले क्रीम, मेथी, मटार आणि मीठ घालुन एकत्र करणे व ग्रेव्ही २ मिनिट शिजवणे.
टीप
मेथीतून पाणी एकदम काढून टाकणे नाहीतर भजी हिरवट होते
खसखस आणि काजू आधी थोडावेळ भिजवलेतर वाटायला सोप्पे जाते
ग्रेव्ही एकदम पातळ वाटल्यास त्यात १/४ चमचे कॉर्न फ्लौर थोड्या पाण्यात एकत्र करून घालणे. जर ग्रेव्ही जाड वाटली तर थोडे दुध घालुन ग्रेव्ही पातळ करता येईल
0 comments:
Post a Comment