मुळ्याचा पराठा
पहिल्यांदाच मुळी आणलेली. आम्हाला दोघांनाही फार काही ते आवडत नसल्यानी मी त्याची भाजी करण्याऎवजी पराठे केले
साहित्य
२ मुळी
७ चमचाभरून गव्हाचे पीठ
३-४ हिरव्या मिरच्या
१ चमचा आले लसूण पेस्ट
चिमुटभर तिखट
१ चमचा धने पूड
मुठभर कोथिंबीर
मीठ
तेल
तूप
कृती
- गव्हाच्या पिठात चमचाभर तेल घालुन पीठ मळणे व अर्धा तास भिजण्यासाठी ठेवणे.
- कढईत तेल गरम करून त्यात आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, धने पूड, तिखट घालणे.
- त्यात मुळी किसून घालणे व मिश्रण गुलाबी होईपर्यंत परतणे
- त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालुन एकत्र करणे व त्याचे छोटे छोटे गोळे करणे.
- मळलेल्या पीठाचे चपातीच्या आकाराचे गोळे करून ते पुरीच्या आकारात जाड लाटणे.
- प्रत्येक लाटणीवर मुळीच्या मिश्रणाचा गोळा ठेवून तो सर्व बाजूनी बंद करणे व चौकोनी लाटणे.
- तव्यावर पराठे तेल किंवा तूप सोडून गुलाबी रंगावर भाजणे.
टीप
मुळी परतताना थोडेसेच तेल वापरणे नाहीतर मिश्रण तेलकट होते
मी हे पराठे थोडे वेगळे दिसण्यासाठी म्हणून चौकोनी बनवले पण नेहमीच्या आलू पराठ्यासारखे गोल पण बनवता येतील.
0 comments:
Post a Comment