Mar 2008
26
आम्रखंड
अजॉयला पुरी आणि आम्रखंड फार आवडते त्यामुळे इथे आमरस कुठे मिळतो ते कळल्यावर मी लगेच बनवले. एकदम छान झालेले.

साहित्य
१ लिटर दुध
१.५ वाटी साखर
१ वाटी आमरस
१ चमचा दही
कृती
- दुध कोमट करून त्यात दही एकत्र करून ६-८ तास गरम जागी ठेवून दही लावणे.
- पंचावर दही ओतून ते टांगून ८-१० ठेवणे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल व चक्का तयार होईल.
- चक्क्यात साखर घालुन दोन तास ठेवणे.
- त्यात आमरस घालुन पुरण यंत्रातून फिरवणे
टीप
साखर आमरसाच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करणे. मी जो आमरस वापरला तो जास्त गोड नव्हता त्यामुळे साखर एकदम व्यवस्थित झाली.
साखर चक्क्यात एकत्र करून ठेवल्यानी चांगली एकत्र होते नाहीतर दही आंबट होऊन साखर वेगळी राहते.
0 comments:
Post a Comment