कॉर्न चाट
हा पदार्थ मी थोड्या वेगवेगळ्या कृती एका पुस्तकात वाचून बनवला
साहित्य
१/४ वाटी मैदा
१/४ वाटी रवा
१/२ चमचा दही
चिमुटभर बेकिंग पूड
२ वाटी कॉर्न
२ टोमाटो
२ कांदे
१ लिंबू
१ चमचा आले लसूण पेस्ट
चिमुटभर गरम मसाला
कोथिंबीर
शेव
मीठ
तेल
कृती
- रवा, मैदा, बेकिंग पूड आणि मीठ एकत्र करणे.
- दही आणि चमचाभर तेल कोमट करणे.
- ते मिश्रण रव्यात घालुन त्याचे पीठ भिजवणे.
- बारीक व पातळ पुऱ्या लाटून तेलात तळणे.
- तेल गरम करून त्यात १/२ टोमाटो किसून, १/२ कांदा किसून घालणे व शिजवणे.
- त्यात आले लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट आणि मीठ घालुन ढवळणे.
- त्यात कॉर्न घालुन शिजवणे.
- कांदा आणि टोमाटो बारीक चिरणे.
- मध्यम आकाराच्या ताटलीत पुऱ्या पसरवणे, त्यावर कॉर्नचे मिश्रण, बारीक चिरलेला कांदा, टोमाटो पसरवणे.
- लिंबू पिळणे व त्यावर कोथिंबीर व शेव पसरवून वाढणे.
टीप
ह्यात १/२ चमचा कच्ची कैरी किसून घालता येईल आणि जर घालत असल्यास लिंबाचा रस थोडा कमी वापरणे.
थोडा चाट मसाला पण घालता येईल
रवा-मैद्याचे पीठ भिजवल्यावर मिश्रण मिक्सरमध्ये फिरवता येईल त्यामुळे व गरम दह्यामुळे पुऱ्या एकदम कुरकुरीत बनतील
Hi Sheetal, Kal me he recipe keli hoti Gharatal sagale khush jhale. Navin kahi tari test karayala bhetal mhanun navara pan khush hota.
Thank You.
Dipali, I am glad you all liked this dish.