हिरवी पाचक लस्सी
थोड्या दिवसांपूर्वी मी पेपरमध्ये एक लेख वाचला तेंव्हा मला ह्या कृतीची आयडिया आली.
साहित्य
१.५ वाटी दही
१/२ वाटी पुदिना
१ वाटी कोथिंबीर
१ काकडी
१/४ वाटी कोबी
चिमुटभर काळे मीठ
२ चमचा साखर
कृती
- काकडी आणि कोबी एकत्र किसणे.
- दही, पुदिना, कोथिंबीर, काकडी, कोबी, काळे मीठ, साखर आणि ५-६ बर्फ एकत्र ५ मिनिट मिक्सरमध्ये वाटणे.
- थंड करून प्यायला देणे.
टीप
मी जाड दुध वापरून दही बनवले पण जर साध्या दुधाचे दही वापरले तर बर्फ थोडा कमी घालणे.
0 comments:
Post a Comment