कलिंगडाची लस्सी
उन्हाळ्याची गरमी वाढल्यापासून मी फळाचा ज्यूस आणि बाकीचे थंडगार पेय्ये बनवतीये. हे त्यातील एक.
साहित्य
३ वाटी कलिंगड
१.५ वाटी दही
३ चमचा साखर
२ चिमुट मिरे पूड
मीठ
कृती
- कलिंगडाच्या बिया काढून टाकणे.
- कलिंगड, दही, साखर, मिरे पूड आणि मीठ एकत्र वाटणे.
- मिश्रण घट्ट असेल तर त्यात थोडा बर्फ घालुन अजून थोडे वाटणे. थंडगार प्यायला देणे.
टीप
मी जाड दुधाचे गोड दही वापरले.
0 comments:
Post a Comment