कोथिंबीर वडी
आज अजॉय परत आला आणि त्याच्यासाठी काहीतरी कोथिंबीरचा पदार्थ बनवण्याचा माझा प्लॅन होता. आईच्या पद्धतीची हि कोथिंबीर वडी मी नाश्त्यासाठी बनवलेली. स्टारटर म्हणूनसुद्धा एकदम चांगला पदार्थ ठरू शकतो.
साहित्य
२ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी बेसन
१/४ वाटी तांदुळाचे पीठ
१ चमचा तिखट
तेल
मीठ
कृती
- कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेणे.
- त्यात बेसन, तांदुळाचे पीठ, तिखट, मीठ आणि चमचाभर तेल घालुन एकत्र मळणे.
- जरुरीनुसार पाणी घालुन गोळा बनवणे व तेल लावलेल्या भाण्यात घालुन शिट्टी न लावता कुकरमध्ये १५-२० मिनिट शिजवणे.
- शिजलेला गोळा थंड झाल्यावर वाड्या कापून तेलावर भाजून घेणे
टीप
जर गोळा मळताना पाणी चुकून जास्त झाले टर त्यात थोडे बेसन घालुन ठीक करता येईल.
मिश्रणात मीठ सांबाळून घालणे कारण थोड्याश्या मीठानी पण लगेच खारटपणा येतो.
0 comments:
Post a Comment