सोल कढी
खूप प्रसिद्ध आणि चविष्ठ कोकणी पदार्थ... सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे कढी एकम पाचक आहे आणि पित्तावरती एकदम रामबाण उपाय आहे. अशीच पिता येईल किंव्हा भातावर घेऊन खाता येईल.
साहित्य
८ कोकम
१ नारळ
१-२ लसूण पाकळ्या
मीठ
कोथिंबीर
कृती
- कोकम १/४ वाटी पाण्यात भिजवून ठेवणे.
- खवलेला नारळ वाटताना त्यात लसूण घालुन वाटावे व दुध काढणे.
- नारळाचे दुध भिजवलेल्या कोकम पाण्यात घालणे.
- त्यात मीठ आणि कोथिंबीर घालुन वाढणे.
टीप
लसुणाची चव आवडत नसेल तर नारळाचे दुध काढताना त्यात लसूण नाही घातले तरी चालते पण लसुणाची एकदम चांगली चव येते.
गोव्यात एकदम चांगले कोकम मिळतात, त्यांना चांगला रंगपण असतो आणि आंबटपणा पण चांगला येतो.
आंबटपणानुसार सोले कमी जास्त करणे. माझ्याकडची सोले जरा जुनी असल्यानी त्यांना आंबटपणा आणि रंग दोन्ही कमी आहे. पण जर नवीन कोकम असतील तर १-२ कमी कोकम पण चालू शकतील.
0 comments:
Post a Comment