भरलेला टोमाटो
जेंव्हा मी हे बनवायला घेतले तेंव्हा मला माहित नव्हत की कस बनेल. पनीर बरोबर काहीतरी नवीन करण्यासाठी म्हणून झालेली हि माझी पाककृती निर्मिती लहानपणी बघितलेल्या एका कुकरच्या झाहीरातीतीवरून प्रेरित आहे.
साहित्य
४ मध्यम आकाराचे टोमाटो
१ कांदा
१.५ वाटी किसलेले पनीर
मुठभरून कोथिंबीर
१ चमचा जीरा
१/४ चमचा मिरे
२ चमचे लोणी
मीठ चवीपुरते
कृती
- टोमाटोचे देठ काढून बाजूला ठेवणे. देठ नंतर वापरायचे आहेत त्यामुळे जपून ठेवणे.
- टोमाटोचा आतला गर काढून भांड्यात ठेवणे.
- कढई गरम करून त्यात लोणी घालणे. कांदे घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
- टोमाटोचा गर घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
- एका ताटलीत शिजलेला टोमाटो, किसलेले पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, मिरे आणि मीठ घालुन एकत्र करणे.
- पोकळ टोमाटोमध्ये हे मिश्रण भरून त्याचे देठ लावून बंद करणे.
- टोमाटोला तेल लावून बेक करणे किंवा कुकर मध्ये वाफवणे
टीप
कांद्याबरोबर मश्रूमपण घालता येतील, थोडी वेगळी चव.
बेक केलेले टोमाटो चांगले लागतात पण कुकर मध्ये केलेले जास्त छान रंग देतात आणि चविष्ठपण होतात.
0 comments:
Post a Comment