Oct 2007
05
गाजर हलवा
एकदम सोपी आणि चविष्ठ अशी हि कृती माझी एकदम आवडती आहे. ह्यात खूप दुध आणि गाजर आहेत त्यामुळे तब्येतीसाठीसुद्धा एकम उत्तम. मी खूप सारे मायक्रोवेव्ह आणि गॅसवर असलेल्या पाककृती करून बघितले पण माझ्यामते हि सगळ्यात उत्तम कृती आहे.

साहित्य
५ वाटी किसलेले गाजर
४ वाटी दुध
१ वाटी साखर
५ चमचे सुकामेवा
४ चमचे तूप
कृती
- कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून त्यात किसलेले गाजर घालुन २ मिनिट मंद आचेवर शिजवणे.
- त्यात एक वाटी दुध घालुन मध्यम आचेवर सारखे ढवळत शिजवणे.
- मिश्रण आटायला लागले की त्यात अजून एक वाटी दुध घालुन शिजवत ठेवणे. असे करत करत सगळे दुध घालुन गाजर पूर्णपणे शिजवणे.
- मिश्रण पूर्ण सुकले की त्यात साखर घालुन पुन्हा ढवळणे व सुकू देणे.
- उरलेले २ चमचे तूप सोडून पुन्हा ढवळून घेणे.
- एका तव्यावर १ चमचा तेल घालुन त्यात सुकामेवा भाजून घेणे व हलव्यावर घालुन ढवळणे.
टीप
हलवा पूर्ण शिजल्यावर तूप घालुन भाजल्यानी एकदम खमंग होतो.
हलव्यामध्ये दुधाचा मसाला घालता येईल.
0 comments:
Post a Comment