Apr 2008
10
गुलाबजाम
आधी मी गिट्सची पाकिटे वापरून गुलाबजाम बनवायचे पण सगळ्यात त्रास व्हायचा तो पाक बरोबर बनवण्याचा. आज मी खव्याचे गुलाबजाम बनवायचे ठरवल्यावर थोडी शोधाशोध करून काय चुकत होते ते समजून घेतले.

साहित्य
१/४ किलो खवा
१ वाटी रवा
१/२ वाटी दुध
२ चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर खाण्याचा सोडा
२ वाटी साखर
३ वाटी पाणी
तेल/तूप
कृती
- रवा आणि दुध एकत्र करून चपातीसाठी भिजवतो तसे पीठ भिजवणे व २ तास भिजण्यासाठी बाजूला ठेवणे.
- त्यात खवा मिसळणे व चांगले मळणे व मिश्रण पुरण यंत्रातून फिरवणे.
- त्यात चिमुटभर वेलची पूड घालुन मळणे व छोटे छोटे गोळे बनवणे.
- कढईत साखर, पाणी एकत्र करून मध्यम आचेवर उकळवणे.
- पाक उकळल्यावर त्यात चिमुटभर वेलची पूड घालुन अजून एक मिनिट उकळवणे व बाजूला ठेवणे.
- कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात ४-५ गुलाब जाम एकावेळी मंद आचेवर तळणे.
- गुलाबी झाले की ते बाजूला ठेवणे व नंतरचे ४-५ गुलाब जाम तळणे. ते गुलाबी होत आले की आधीचे गुलाबजाम पाकात घालणे.
- सगळे गुलाबजाम पाकात घाताळूयावर मिश्रण मंद आचेवर अजून एकदा उकळवणे व ५-६ तास बाजूला ठेवणे.
टीप
गुलाबजाम तेलात टाकल्यावर ते एका मिनिटात तरंगायला पाहिजे नाहीतर मिश्रणात चुइमुभर सोडा घालुन पुन्हा मळणे
पाकात गुलाबजाम घातल्यावर ते तरंगायला पाहिजेत नाहीतर ते व्यवस्थित तळले गेले नाहीयेत
0 comments:
Post a Comment