चॉकोचीप कुकी
ह्या आधी मी जेंव्हा ह्या कुकीज बनवलेल्या तेंव्हा चवीला चांगल्या झालेल्या पण १० कुकीजच्याऎवजी १ मोठं पिझाच्या आकाराची कुकी झालेली. आज एकदम बरोबर झाल्या म्हणून कृती देत आहे
साहित्य
१ वाटी लोणी
३/४ वाटी साखर
३/४ वाटी ब्रावून शुगर
१ अंडे
२.५ वाटी मैदा
३/४ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा मीठ
२०० ग्राम कॅडबरी
कृती
- लोणी, साखर, ब्रावून शुगर आणि अंडे एकत्र फेटणे.
- मैदा, बेकिंग पूड आणि मीठ दोन वेळा एकत्र चाळून घेणे
- मैद्याचे मिश्रण एका वेळी चार-चार चमचे अंडे आणि लोण्याच्या मिश्रणात घालत एकत्र करणे.
- कॅडबरीचे बारीक तुकडे करून ते मिश्रणात एकत्र करणे.
- ओव्हन २५०C वर गरम करणे.
- तव्याला लोण्याचा हात लावून त्यावर छोट्या छोट्या आकाराच्या कुकी करून २ इंच जागा ठेवत पसरवणे.
- ओव्हनमध्ये २५०C वर १० मिनिट भाजणे व नंतर थंड झाल्यावर डब्यात भरणे.
टीप
कुकी भाजताना त्या पसरतात त्यामुळे थोड्या जाड थापणे आणि त्यांच्या २ इंच जागा ठेवणे आवश्यक आहे नाहीतर त्या पातळ होतील किंवा एकमेकांना चिकटतील.
ब्रावून शुगर वापराल्यानी कुकी चांगल्या गुलाबी रंगाच्या बनतात
0 comments:
Post a Comment