मटार पॅटिस
सकाळच्या नाष्ट्यासाठी झटपट आणि चटपट पदार्थ बनवण्यासाठी मी हे पॅटिस बनवले.
साहित्य
१ वाटी मटार
४ बटाटे
२ चमचा कॉर्न फ्लौर
१/४ चमचा लसूण पेस्ट
चिमुटभर आले पेस्ट
चिमुटभर हळद
१/४ चमचा तिखट
१/२ लिंबू
मीठ
तेल
कृती
- बटाटे उकडून थंड झाल्यावर किसून घेणे.
- त्यात कॉर्न फ्लौर घालुन मळणे. त्याला थोडे तेल लावणे व बाजूला ठेवणे.
- मटार उकळवून त्यातले पाणी काढून टाकणे.
- त्यात हळद, आले पेस्ट, लसूण पेस्ट, तिखट, लिंबाचा रस आणि मीठ घालुन एकत्र करणे.
- लिंबाच्या आकाराचा बटाट्याचा गोळा करून त्याची वाटी करणे व त्यात चमचाभर मटारचे मिश्रण घालुन बंद करणे. अलगद दाबून पसरट पॅटिस बनवणे
- तेलात मध्यम आचेवर तव्यावर भाजणे.
टीप
मटार पॅटिस तळताना तेल एकदम गरम असले पाहिजे नाहीतर बटाट्याचे मिश्रण तव्याला चिकटते
तव्याच्या ऎवजी कढईत पण टाळता येईल
0 comments:
Post a Comment