Apr 2008
15
व्हेज नर्गीसी कबाब
हा पूर्ण व्हेज नसलातरी जे लोक व्हेज व्ह्यातिरिक्त फक्त अंडी खातात त्याच्यासाठी एकदम मस्त पदार्थ आहे. अर्थातच नॉनव्हेज लोक तर खाऊ शकतीलच. मी पुस्तकात ह्या कबाब विषयी वाचलेले आणि आधी मटणाच्या खिम्याचे बनवलेलेपण आज काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात हे तयार झाले.

साहित्य
६ अंडी
५ बटाटे
१ चमचा कॉर्न फ्लौर
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
मीठ
तेल
कृती
- अंडी उकडून त्यांची साले काढून बाजूला ठेवणे.
- बटाटे उकडून त्यांचा कीस करणे.
- चमचाभर तेल गरम करून त्यात गरम मसाला, लसूण पेस्ट, तिखट, जिरे पूड आणि धने पूड घालणे.
- त्यात किसलेला बटाटा घालुन एक मिनिट परतणे.
- मिश्रण कोमट झाले की त्यात कॉर्न फ्लौर घालुन मळणे.
- मिश्रण ६ भागात करून प्रत्येकाचा गोळा करून त्याला वाटीचा आकार देणे.
- प्रत्येक वाटीत एक अंडे घालुन वाटी बंद करणे व तेलात गुलाबी रंगावर तळणे.
टीप
मिश्रण मळताना हाताला तेल लावणे म्हणजे ते चिकटत नाही
किसलेला फ्लावर बटाट्याच्या मिश्रणात घालुन मी थोडा वेगळा चावीचा प्रयोग करून बघणार आहे
0 comments:
Post a Comment