कॉलीफ्लॉवर पराठे
आज एकदम मस्त ताजा ताजा कॉलीफ्लॉवर मिळाला आणि मी हे पराठे बनवण्याचे ठरवले. एकदम मस्त झालेले.
साहित्य
६ चमचेभरून गव्हाचे पीठ
१ कॉलीफ्लॉवर
१ कांदा
१ चमचा जिरे
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१ चमचा आमचूर पूड
तेल/तूप
मीठ
कृती
- चपातीला भिजवतात तसे गव्हाचे पीठ भिजवून घेणे.
- फ्लॉवर आणि कांदा किसून घेणे.
- त्यात मीठ घालुन १० - १५ मिनिट पाणी सुटण्यासाठी ठेवून देणे.
- त्यातून पाणी काढून टाकून त्यात जीरा, तिखट, हळद आणि आमचूर पूड घालुन मिश्रण बनवणे.
- गव्हाच्या पीठाचे गोळे बनवून वाटी बनवणे व त्यात आधी बनवलेले मिश्रण घालुन बंद करणे.
- पराठा अलगद लाटून घेणे व मध्यम आचेवर तव्यावर तेल किंवा तूप घालुन भाजून घेणे.
टीप
फ्लॉवर ताजा नसेल तर कढईत मिश्रण घालुन फ्लॉवर शिजेपर्यंत ढवळत मध्यम आचेवर ठेवणे.
मिश्रणात उकडलेला बाटतात कुस्करून घातला तर आलू गोबी पराठा पण बनवता येईल
मी परतः भाजताना एक बाजू तेलानी आणि एक बाजू तूप लावून भाजते.
0 comments:
Post a Comment